Ravan Flood  Dainik Gomantak
गोवा

Sattari Flood: पावसामुळे साकवावर पाणी, मुख्य रस्ताही अत्यंत खराब; पुलाची उंची वाढवण्याची मागणी

Ravan Flood: ३६ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात; साकवावरून पाणी वाहते तेव्हा या मुलांना शाळेत जाणे कठीण होते

गोमन्तक डिजिटल टीम

पर्ये: रावण, सत्तरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या समोरील वाहणाऱ्या ओहोळाचे पाणी मोठ्या पावसावेळी रस्त्यावरून वाहत असल्याने शाळेत येणाऱ्या मुलांची मोठी धांदल उडते. मुलांना शाळेत येण्यासाठी धोका उद्भवतो. त्यामुळे या ओहोळावर असलेल्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

येथील प्राथमिक विद्यालयाच्या शेजारील पावसाळ्यात वाहणारा लहान ओहोळ वाहतो. मोठ्या पावसावेळी या ओहोळाला मोठे पाणी येते. येथील मुख्य रस्त्यावरून विद्यालयात जायला हा ओहोळ पार करावा लागतो. सध्या या ओहोळावर मोठे पाइप टाकून साकववजा पूल उभारला आहे. मोठ्या पावसावेळी ओहोळाचे पाणी या साकवावरून वाहते तेव्हा या शाळेकडे जाणारी वाट बंद होते.

या पावसाळ्यात मोठ्या पावसावेळी असे अनेकदा साकवावरून पाणी गेल्याने मुलांची मोठी धांदल उडाली. सरकारने या साकवाला टाकलेली पाइप काढून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, रावण गावातील मुख्य रस्त्याची स्थितीही अत्यंत खराब झाली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांत हरवला आहे गेल्या सात आठ वर्षांत या रस्त्याचे एकदाही डांबरीकरण झालेले नाही. स्थानिक पंच तसेच आमदारानेही याकडे दुर्लक्ष चालवल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शाळेत ३६ विद्यार्थी

या सरकारी शाळेत प्राथमिक व पूर्वप्राथमिक वर्ग चालतात. एकूण ३६ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. साकवावरून पाणी वाहते तेव्हा या मुलांना शाळेत जाणे कठीण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT