Ration Card Suspended Dainik Gomantak
गोवा

Ration Card Suspended : 5 लाखांहून जादा उत्पन्न असणाऱ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द; सरकारी बाबूंना फटका

५० हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना मिळणार बीपीएल कार्ड

दैनिक गोमन्तक

Ration Card Suspended : नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी काढलेल्या पत्रकात पीएचए किंवा एएआय रेशनकार्ड धारकांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा अधिक असेल त्यांना दारिद्र्य रेषेवरील रेशनकार्ड दिले जाणार आहे, तर ज्या दारीद्र्यरेषेखालील कार्डधारकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांहून अधिक आहे, त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार आहे.

सरकारी खात्यातील बहुतेक कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून अधिक आहे. वार्षिक उत्पन्न म्हणजे शिधापत्रिकांमध्ये नाव असलेल्या सर्वांचे एकत्रित उत्पन्न, असे धरले जाणार आहे. त्यामुळे याचा फटका मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

नागरी पुरवठा खात्यामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांची त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती घेतली जाणार आहे. रेशनकार्डावर नावे असलेल्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ५ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांनी स्वतःहून संबंधित तालुक्यात रेशनकार्ड जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पहिले लक्ष्य सरकारी कर्मचारी !

या रेशनकार्डांची खात्यामार्फत सविस्तर तपासणी झाली, तर सरकारी कर्मचारी असलेल्यांचे रेशनकार्ड मोठ्या प्रमाणात रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारचे प्रथम लक्ष हे सरकारी कर्मचारी असतील.

खासगी कंपन्यात कामाला असलेल्यांच्या वार्षिक उत्पन्नाबाबत नागरी पुरवठाच्या तालुका निरीक्षकांना संशय आल्यास त्यांना मामलेदारांकडून उत्पन्नाचा दाखला सादर करण्याच्या सूचना करण्यात येतील. एखाद्या रेशनकार्डधारकाविरुद्ध तक्रारी आल्यास त्याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT