Rapid Chess Dainik Gomantak
गोवा

Rapid Chess: ग्रँडमास्टर लक्ष्मणला बुद्धिबळ विजेतेपद

लिबरेशन कप स्पर्धा ः शरण, कर्तव्य, नीतिश, सम्मेद यांचीही चमक

किशोर पेटकर

Rapid Chess: चेन्नई येथील ग्रँडमास्टर आर. आर. लक्ष्मण याने अखिल भारतीय लिबरेशन कप फिडे मानांकन रॅपिड खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबतर्फे घेण्यात आलेली स्पर्धा ताळगाव येथील सेंट मायकल्स कम्युनिटी सेंटरमध्ये झाली.

लक्ष्मण याने साडेसात गुण नोंदविले. कर्नाटकचा शरण राव, गुजरातचा कर्तव्य अनाडकट, गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) नीतिश बेलुरकर, महाराष्ट्राचा आयएम सम्मेद शेटे यांनीही प्रत्येकी साडेसात गुणांची नोंद केली.

टायब्रेकर गुणांत त्यांना अनुक्रमे दुसरा ते पाचवा क्रमांक मिळाला. गोव्याचे ऋत्विज परब व देवेश नाईक यांचे समान सात गुण झाले. त्यांना अनुक्रमे सहावा व सातवा क्रमांक मिळाला.

एसए कन्नन, पार्थ साळवी, ऋषिकेश परब, आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, आर्यन रायकर यांचेही सात गुण झाले. त्यांना अनुक्रमे आठवा ते बारावा क्रमांक प्राप्त झाला.

बक्षीस वितरण योगीश धेंपे, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी यांच्या उपस्थितीत झाले. क्लबच्या अध्यक्ष रुपा बेलुरकर यांनी अहवाल सादर केला. सुनेत्रा डागरे यांनी आभार मानले, तर प्रज्ञा काकोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT