Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Jharme Village Water Contamination: सत्तरीतील झर्मे गावात पिण्याच्या पाण्यात जंतुसदृश जीव आढळल्याच्या वृत्ताची गोवा मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची स्वतःहून चौकशी सुरू केली आहे.
 Jharme Village Water Contamination
Sattari water IsuueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सत्तरीतील झर्मे गावात पिण्याच्या पाण्यात जंतुसदृश जीव आढळल्याच्या वृत्ताची गोवा मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची स्वतःहून चौकशी सुरू केली आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित करत, आयोगाने या प्रकरणावर तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित सरकारी विभागांना दिले आहेत.

या पाण्यामध्ये जंतुसदृश जीव सापडत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. या बातम्यांची आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती भारत देशपांडे आणि सदस्य प्रमोद कामत यांनी गंभीर दखल घेतली आहे.

 Jharme Village Water Contamination
Goa Health Services: राज्यात 'आयसीयू' सेवांना बळ, 'आयुर्वेद आरोग्य व्यवस्थापन'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

आयोगाने याप्रकरणी प्रधान मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पणजी, सचिव (आरोग्य), आरोग्य विभाग, गोवा सरकार, पर्वरी आणि साहाय्यक अभियंता, उपविभाग ४, बांधकाम विभाग १६, वाळपई, सत्तरी यांना नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांना २३ जून २०२६ रोजी आयोगासमोर या प्रकरणी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी सुनावणीत संबंधित विभागांना पाणी शुद्धतेबाबतचा सर्वसमावेशक कृती आराखडा सादर करावा लागणार आहे.

जनतेमध्ये तीव्र संताप!

सत्तरी परिसरातील दूषित पाणीपुरवठ्याची ही दुसरी घटना आहे, ज्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याआधीही अशा तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र, त्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com