babush monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monseratte : बलात्कारप्रकरणी मोन्सेरात यांच्यामागे ससेमिरा सुरूच

न्यायालयात पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्याविरुद्धच्या कथित बलात्कार प्रकरणाचा खटला न्यायालयात आहे. आज याच्या सुनावणीवेळी पीडितेने सरकारी वकिलांना सहाय्य करण्यासाठी तिच्या वकिलांना परवानगी देण्याचा अर्ज आज अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला. या खटल्यावरील सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्यासाठी संशयित मोन्सेरात यांनी आज परवानगी घेतल्याने ते न्यायालयात उपस्थित नव्हते. ही सुनावणी आता येत्या २ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे.

मोन्सेरात व रोझारिया ऊर्फ रोझी फेर्रोस या दोघांविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली आरोप निश्‍चित होऊन त्यावरील खटला सुरू झाला आहे. पोलिसांच्या २५० पानी आरोपपत्रात ४० जण साक्षीदार आहेत. या घटनेची तक्रार महिला पोलिस स्थानकात मे २०१६ मध्ये नोंद होऊन त्यावेळी मोन्सेरात व फेर्रोस यांना अटक झाली होती. जुलै २०१८ मध्ये आरोपपत्र सादर केल्यानंतर जून २०१९ मध्ये न्यायालयाने आरोप निश्‍चितीचा आदेश दिला होता.

‘पोलिस स्थानक’ प्रकरणाची सुनावणी

मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्यासह ३६ जणांविरुद्ध पणजी पोलिस स्थानकावरील हल्लाप्रकरणीची सुनावणी न्यायालयात सुरू झाली आहे. या प्रकरणामध्येही न्यायालयाने संशयितांना सुनावणीवेळी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मंत्री मोन्सेरात व आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्यासह इतर कोणत्याही संशयिताने खटल्यावरील सुनावणीवेळी अनुपस्‍थित राहण्याची अनुमती मागितलेली नाही. आतापर्यंत दोनवेळा सुनावणी झाली आहे. त्याला मंत्री बाबुश मोन्सेरात हे उपस्थित राहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT