Randeep Hooda, Ankita Lokhande Dainik Gomantak
गोवा

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

IFFI 2024: विस्मृतीत चाललेल्या नायकांच्या आयुष्यांवर प्रकाश टाकण्यासाठी भविष्यात नक्की अशा चित्रपटांची निर्मिती केली जाईल, परंतु तशी मला आशा वाटते, असे मत प्रख्यात अभिनेता रणदीप हुडा यांनी व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Randeep Hooda IFFI Press Conference

पणजी: स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपण केवळ ऐकले होते, त्यांच्यावर साकारलेला चित्रपट खऱ्या अर्थाने आपले डोळे उघडणारा ठरला आहे. बिरसा मुंडासारखे अनेक क्रांतिकारी होऊन गेले, अशा विस्मृतीत चाललेल्या नायकांच्या आयुष्यांवर प्रकाश टाकण्यासाठी भविष्यात नक्की अशा चित्रपटांची निर्मिती केली जाईल, परंतु तशी मला आशा वाटते, असे मत प्रख्यात अभिनेता रणदीप हुडा यांनी व्यक्त केले.

इंडियन पॅनोरामामध्ये शुभारंभीचा चित्रपट म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानिमित्ताने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिकाही हुडा यांनीच साकारली आहे. हुडा यांच्याकडे पाहिल्यानंतर पोलिसांच्या विविध भूमिका नजरेसमोर येतात.

एक चोखंदळ अभिनेता म्हणून त्यांची सिनेसृष्टीत ओळख आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखा चित्रपट आपण कधी करू, असे कधी वाटले नव्हते. परंतु कथा ऐकल्यानंतर तो चित्रपट करायचे ठरले. प्रत्यक्षात अंदमान निकोबार येथील सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर सावरकर कसे राहिले असतील, याची कल्पनाही करवत नव्हती.

सावरकरांना नेहमीच भारताने लष्करीदृष्ट्या सामर्थ्यवान व्हावे, असे वाटत होते. आज जगभरात आपले स्थान त्या बाबतीत लक्षणीयरित्या सुधारले आहे.

हा चित्रपट आपल्या सशस्त्र संघर्षाच्या वेगळ्या पैलूवर भर देतो आणि क्रांतीकारकांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शस्त्रे हाती घेण्यासाठी या पैलूने कसे प्रेरित केले याचे दर्शन घडवतो.

सावरकरांच्या वैचारिक संघर्षाचा शोध

सावरकर यांच्या जीवनाचे अनेक पैलू या चित्रपटात पहायला मिळतात. सशस्त्र उठावाच्या बाजूने कट्टर भूमिका घेणारे क्रांतिकारक म्हणून त्यांचे झालेले परिवर्तन, वैचारिक संघर्ष व त्यांचा तुरुंगातील काळ यांचा हा चित्रपट शोध घेतो. इंग्रजांच्या काळात काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून या ठिकाणाकडे पाहिले जात होते. पण जेलमध्ये चित्रिकरण सुरू असताना तेथे नुकतेच लग्न झालेली जोडपी आल्याचे पाहून आश्चर्य वाटले, असे रणदीपने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT