
Vidhu Vinod Chopra At IFFI Master Class
पणजी: ‘माझ्या सुरुवातीच्या काळात मी ‘खामोश’ हा चित्रपट बनवला. हा चित्रपट मी अनेक वितरकांना दाखवत होतो... सारे जण या सिनेमाचे कौतुक करत असत; मात्र तो विकत घेण्यासाठी कोणीही तयार नव्हते.
शेवटी मुंबईतील रिगल चित्रपटगृहाच्या मालकांनी माझा चित्रपट पाहून मला थिएटर दिले. या थिएटरमधील पहिला शो फक्त चार ते पाच माणसांनी पाहिला. मात्र, बाहेर मला काही माणसे भेटली त्यांच्यापैकी एकाने मला विचारले ‘तूने पिक्चर बनाया है क्या?’ आणि तो पुढे असेही म्हणाला, ‘डरो मत तुम्हाला पिक्चर अच्छा है, आज का रात का शो फुल जायेगा’.
‘आश्चर्य म्हणजे रात्रीचा शो फुल झाला होता आणि ज्यांनी मला शो फुल जाणार म्हणून सांगितलं होते ते बाहेर तिकिटांचा काळाबाजार करत होते. त्यावेळी मला कळले की सिनेमा बनवणाऱ्यांची नाडी कुणाच्या हातात असते.
अर्थात हा तेव्हाचा काळ होता’. विधू विनोद चोप्रा आपला सिनेमा निर्मितीचा प्रवास उघडून दाखवत होते आणि त्यांचे एक एक अनुभव उपस्थितांना अवाक करत होते.
मास्टर क्लास विभागातीलमधील ‘लिविंग मुव्हीज: फिल्म मेकिंग अँड क्रिएटिव्ह लाईफ'' या विषयावरील सत्राला विधू विनोद चोप्रा आणि त्यांची मुलाखत घेणारे, संगीतकार शांतनू मोईत्रा यांनी चक्क एक संगितिकेचे रूप दिले. शून्यामधून घडलेला विधू विनोद चोप्रा यांचा निर्मिती प्रवास उलगडताना या दोघांनी गाणी मनसोक्तपणे म्हटली आणि त्यात प्रेक्षकांनाही सहभागी करून घेतले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.