Sunni Gulistan Mosque Gogol Dainik Gomantak
गोवा

Gulistan Mosque Gogol: 'मशिदीचे टाळे काढा'! घोगळ येथे जमला जमाव; ‘रमजान’साठी लोकांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणार बैठक

Sunni Gulistan Mosque Gogol: मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी याबाबत बैठक घेणार असून, त्यानंतर यावर तोडगा निघेल असे स्पष्ट केले. यावेळी गोवा हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला हेही उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: पवित्र रमझान महिना जवळ आल्याने प्रशासनाने सील ठोकलेल्या हाउसिंग बोर्ड, घोगळ येथील सुन्नी गुलिस्तान मशिद पुन्हा मुस्लिम धर्मीयांसाठी खुली करावी, अशी मागणी करत सोमवारी जमाव या मशिदीसमोर एकत्र आला. स्थानिक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी त्यांची समजूत काढताना, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू नका असे कडक शब्दात सुनावले.

मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी याबाबत बैठक घेणार असून, त्यानंतर यावर तोडगा निघेल असे स्पष्ट केले. यावेळी गोवा हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला हेही उपस्थित होते. ३० जानेवारी रोजी याच मशिदीच्या आवरात मशीद समितीचा उपाध्यक्ष अली खानजादे याचा पोटात चाकू भोसकून खून झाला होता.

मशिदीवरील ताबा व निधी गोळा करण्याच्या कारणास्तव असलेल्या वादातून ही घटना घडलेली होती. या प्रकरणी आठजणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. मशिदीत कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मशिदीला टाळे ठोकले आहे.

या मशिदीच्या समोर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी येथे जमाव जमल्यानंतर जादा पोलिस कुमक बोलाविण्यात आली. मशीद ही अल्लाहचे घर आहे आणि ते जास्त काळ बंद ठेवणे चुकीचे आहे. गुन्हेगारांवर कारवाई व्हावी, मात्र भाविकांना नमाजापासून वंचित ठेवू नये. मशिदीचे टाळे खोलावे व आम्हाला धार्मिक काम करण्यास द्यावे, अशी मागणी केली.

शांतता राखा, तोडगा निघेल : रेजिनाल्ड

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी यावेळी धार्मिक स्थळ हे बंद राहता कामा नये पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण व्हायला नको, शांतता राखून सर्व काही उपाययोजना करुया, यासाठीच मध्यस्थी केलेली आहे. समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी सायंकाळी एका शिष्टमंडळासह दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT