Gogol Crime: मशिदीच्या आवारात चाकूने केला वार! घाेगळ खून प्रकरणातील फराराच्या आवळल्या मुसक्या; 4 दिवसांची पोलिस कोठडी

Gogol Gulistan Mosque Murder: घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचा उपाध्यक्ष अली याचा ३० जानेवारी रोजी याच मशिदीच्या आवारात त्याचा शुक्रवारचा नमाजानंतर पोटात चाकू खुपसून खून केला होता.
Gogol Gulistan Mosque Murder
Gogol Gulistan Mosque MurderDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: अली कलंदर खानजादे खून प्रकरणात  फरार असलेला साहिल कन्वी उर्फ स्पाकी  याला अखेर फातोर्डा पोलिसांनी जेरबंद केले. खुनाच्या घटनेनंतर तो पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर तो मडगावच्या कदंब बसस्थानकाजवळ पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मागाहून  त्याला न्यायालयात उभे केले असता, अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.  

Gogol Gulistan Mosque Murder
Gogol Masjid Crime: घोगळ खून प्रकरणातील 6 संशयित अजूनही फरार, आदेश येईपर्यंत मशीद बंदच Video

घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचा उपाध्यक्ष अली याचा ३० जानेवारी रोजी याच मशिदीच्या आवारात त्याचा शुक्रवारचा नमाजानंतर पोटात चाकू खुपसून खून केला होता. मशिद समितीच्या वादातून खुनाची वरील घटना घडली होती. 

Gogol Gulistan Mosque Murder
Gogol Mosque Crime: खुनानंतर घोगळमध्ये तणावाचे वातावरण! गुलिस्तान मशिदीला ठोकले टाळे; आणखी 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

रालोय येथून मुलीचे अपहरण

रालोय सांज जुझे दि अरियाल येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अज्ञातावर भारतीय न्याय संहितेच्या १३७ (२) व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत नाईक पुढील तपास करीत आहेत. १ फेब्रुवारीला अपहरणाची ही घटना घडली होती. याप्रकरणी पिडीतेच्या पालकांनी पोलिसात रीतसर तक्रार नोंदविली. पोलिस या मुलीचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com