Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

आरोग्याबाबत जागृती होण्याची गरज: रमेश तवडकर

काणकोण आरोग्य मेळाव्यात 815 रुग्णांची तपासणी

दैनिक गोमन्तक

काणकोण: अन्न, वस्त्र निवारा याबरोबरच शिक्षण व आरोग्य या प्रमुख गरजा आहेत. सध्या राज्यात अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबाबतीत सर्वच समाधानी आहेत; मात्र आरोग्य व शिक्षण याबाबतीत जागृती होण्याची गरज असल्याचे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

आरोग्य मेळाव्याच्या उद्‌घाटनावेळी तवडकर बोलत होते. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर, काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर, गटविकास अधिकारी अनिल नाईक, नगरसेवक हेमंत नाईक गावकर, नर्सिसो फर्नांडिस, अमिता पागी, सारा देसाई, आरोग्य शिक्षक भाऊसाहेब राणे, बालविकास अधिकारी आकांक्षा नाईक गावकर, डॉ. तावारीस, शिक्षणाधिकारी मोतीलाल नाईक गावकर आदी उपस्थित होते.

काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात आरोग्य संचालनालयाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आरोग्य मेळाव्याचा ८१५ रुग्णांनी लाभ घेतला. आरोग्य मेळाव्याचा तालुक्यातील अंतर्गत भागातील रहिवाशांना लाभ घेता यावा म्हणून प्रत्येक पंचायत क्षेत्रातून रुग्णांची ने-आण करण्यासाठी बालरथांची सोय करण्यात आली होती.

यावेळी सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे डॉ. नवज्योत हळर्णकर यांच्या हस्ते तवडकर यांचा गौरव करण्यात आला. विजया केंकरे, दीपाली नाईक, किशोरी कोमरपंत, अभया मुडकुडकर, मंजिता काणकोणकर यांनी स्वागत केले. डॉ. दिवाकर वेळीप व प्रशांत देविदास यांनी संयोजन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT