Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाणीबाबत भाष्य करण्याचे सभापती तवडकरांनी टाळले, म्हणाले सरकार योग्य...

गोवा खाण व्यवसाय आपल्या अखत्यारित येत नसल्याच केले स्पष्ट

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात निवडणूकांचे रणशिंग फुंकल्यानंतर खाण व्यवसायावरुन राजकिय नेत्यांच्या चर्चांना उधाण येते. आणि निवडणूक पार पडल्यानंतर या विषयावर बोलणे सोईस्करपणे टाळले जाते. याचा प्रत्यय आज आला असून गोवा विधानसभा सभापती रमेश तवडकर यांना गोव्यातील खाण व्यवसायाबाबत प्रश्न विचारला असता आपल्या अखत्यारित हा विषय येत नसल्याचे स्पष्ट करत या विषयाला त्यांनी बगल दिली.

(Ramesh Tawadkar said Goa government will take the right decision on mining issues)

सुरुवातीला यावर भाष्य करणे तवडकर यांनी टाळले असले तरी याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, गोवा सरकार खाणी चालू करण्यासाठी वेगवेगळ्या पद्दतीने अभ्यास करीत आहे. तसेच त्या - त्या मतदारसंघातील आमदार, या विषयातील तज्ज्ञ यांचा यावर अभ्यास सुरु असून तेच यावर अधिक योग्य प्रकारे माहिती देऊ शकतील असे तवडकर म्हणाले.

गोव्याचा काही भाग हा पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील आहे. यामूळे हा विषय योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे. तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यास गोवा सरकार कटीबद्ध आहे. त्यामूळे गोव्यातील खाण उद्योगाबाबत ही सरकार योग्य निर्णय घेईल असा विश्वास ही तवडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT