Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

सभापती तवडकरः काणकोणचा विकास होणारच

'पक्षाने दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडणार'

दैनिक गोमन्तक

काणकोण: राज्य विधानसभा सभागृहाचे सर्वोच्चपद पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून तसेच कार्यक्षमता ओळखूनच दिले आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे. माझा स्वतःच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे,असे सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पक्षाने मोठे केले आहे. सभापतिपदाची घोषणा झाली, त्यानंतर दोन दिवस मंत्री मिळायला हवे होते,असे वाटत होते. मात्र त्यानंतर सकारात्मक विचार केला, पक्षाने मोठ्या संवैधानिक पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.मंत्रिपदापेक्षा हे पद मोठे आहे.

मूळातच माझा पिंड पीडित समाजाचे दुःख हलके करण्याचा आहे, त्यामुळेच कदाचित नियतीने साथ देऊन एका शिक्षकाला चार वेळा आमदार बनविले आणि आता सर्वोच्च पद दिले आहे.

सभापतिपद मिळाल्यानंतर काणकोणचा विकास थांबणार नाही, उलट त्याला गती मिळणार आहे. विधानसभा काळात सभापतींचे विशेष काम असते. अन्य काळात आठवड्यातून एक दोन वेळाच पणजीला कार्यालयीन कामानिमित्त जावे लागणार आहे. काणकोणमधील रवींद्र भवनाचे काम गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे आर्थिक मंदी आल्यामुळे रखडले होते. मात्र, आता त्याला गती देऊन एका वर्षात रवींद्र भवन पूर्ण करण्यात येणार आहे. कृषी भवनच्या कामालाही चालना देण्यात येणार आहे. गावडोंगरी,खोतीगाव व पैगीण पंचायतीच्या काही वाड्यांना गावणे धरण वरदान ठरणार आहे. 21 कोटी रूपयांचा हा प्रकल्प फक्त धरण उभारून बंद ठेवण्यात आला आहे.या धरणाचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी खोतीगावातील कुस्केपर्यंत नेण्याची योजना आहे,ही सर्व कामे मार्गी लावू,असे तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT