Michael Lobo & Digambar Kama Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: अपात्रता याचिका! आमदार लोबो, कामतांना सभापती तवडकरांची नोटीस

लोबो आणि कामत यांना 16 डिसेंबर रोजी आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pramod Yadav

काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याचा अयशस्वी प्रयत्न काँग्रेस आमदारांकडून केला होता. यानंतर पक्षांतर रोखण्यासाठी काँग्रेसकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता माजी विरोधीपक्षनेते व कळंगुटचे आमदार मायकल लोबो (Michael Lobo) आणि माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांना विधानसभा सभापती रमेश तवडकर यांनी नोटीस दिली आहे. लोबो आणि कामत यांना 16 डिसेंबर रोजी आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गोवा प्रदेश काँग्रेसचे अमित पाटकर (GPCC) यांनी काँग्रेस आमदारांचे पक्षांतर रोखण्यासाठी विधानसभा सभापती रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांच्याकडे अपात्र याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वजाता पर्वरी येथील सभापतीच्या दालनात सुनावणी होणार आहे. यासाठी आमदार लोबो आणि कामत यांना उपस्थित राहवे लागणार आहे. दोघांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. असे सभापती तवडकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आमदारांनी जुलै 2022 मध्ये पक्षांतर करून भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अमित पाटकर (Amit Patkar) यांनी अपात्रता याचिका दाखल केली होती. "काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली आहे. दोघांनाही स्वत: पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे. सर्वेाच्च न्यायालयाच्या 2020 च्या निकालानुसार कोणतेही पक्षविरोधी काम केल्यास त्यांनी पक्षाचे सदस्यत्व सोडले असा अर्थ होतो." असे अमित पाटकर म्हणाले.

दरम्यान, सप्टेंबर 14, 2022 रोजी आठ काँग्रेस आमदारांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेसकडून सभापती रमेश तवडकर यांच्याकडे दोन अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस आमदारांनी काहीही झाले तरी पक्षांतर करणार नाही यासाठी मंदीर, मशीद आणि चर्चेमध्ये जाऊन शपथ घेतली होती. तसेच, यासाठी शपथपत्र देखील सादर केले होते. दरम्यान, आठ काँग्रेस आमदारांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे संख्याबळ वाढून 28 झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT