Goa government reshuffle 2025 Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat Ramesh Tawadkar Oath: दिगंबर कामतांना देव पावला, रमेश तवडकरांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ; आता खाती कोणती मिळणार याची उत्सुकता

Swearing in ceremony Goa: माजी सभापती रमेश तवडकर आणि आमदार दिगंबर कामत यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ घेतली.

Akshata Chhatre

Goa Cabinet Expansion Oath

गोव्याच्या राजकारणात आज एक मोठा बदल घडला. विधानसभेचे माजी सभापती रमेश तवडकर आणि आमदार दिगंबर कामत यांनी गुरुवारी (दि.२१) दुपारी १२ वाजता राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

"पक्षनिर्णयानुसार मंत्रिपद स्वीकारले" रमेश तवडकर

या दोघांच्या मंत्रिमंडळात समावेशासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांना औपचारिक विनंती केली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

शपथविधीनंतर विधानसभेत दाखल झालेले रमेश तवडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मी विधानसभा अध्यक्ष म्हणून माझ्या कामावर समाधानी होतो आणि पूर्ण कार्यकाळ काम करण्याची माझी इच्छा होती." मात्र, पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करत त्यांनी मंत्रिपद स्वीकारल्याचे स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत आणि सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील आमदारांनी, विशेषतः विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

मंत्रिपदाच्या जागांवरून रस्सीखेच

गेल्या वर्षभरापासून रखडलेला हा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पूर्ण झाला. या फेरबदलामुळे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. तसेच, आदल्या दिवशीच कायदामंत्री अलेक्स सिक्वेरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन जागांवर रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांना संधी मिळाली आहे.

या विस्तारामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी इच्छुक असलेले आमदार संकल्प आमोणकर (मडगाव) आणि मायकल लोबो (कळंगुट) यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश तूर्तास लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात आणखी काही राजकीय घडामोडी घडतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bad Roads in Goa: यंदाही 'बाप्‍पा' येणार खड्ड्यांतून! मांद्रे, हरमल, मोरजीसह पेडण्यातील रस्त्यांची दुर्दशा; गणेश चतुर्थीपूर्वी 'विघ्न' दूर होणार?

Fake Payment App: स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवलात तर नुकसान निश्चित; 'फेक पेमेंट अ‍ॅप' स्कॅमपासून वाचण्यासाठी सजग व्हा

Konkani Films: मोफत असूनही प्रेक्षक नाहीत; मग 'कोकणी चित्रपट' तिकीट काढून कोण पाहणार?

Goa Politics: रमेश तवडकर व दिगंबर कामत मंत्रिपदी आरूढ; पण फेरबदलात लोकांच्या हिताचा विचार झाला का? प्रश्न अनुत्तरित

ओल्ड वाईन इन न्यू बॉटल! प्रमोद सावंतांच्या सरकारमध्ये दिगंबर कामतांची मेजॉरिटी; भाजप कार्यकर्त्यांना सरदेसाई म्हणाले, 'RIP'

SCROLL FOR NEXT