Ramdas Athawale Statement on ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: रामदास आठवलेंच्या 'त्या' व्यक्तव्याचे खापर कार्यकर्त्यांवर; सतीश कोरगावकरांचा खुलासा

वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात खळबळ

Kavya Powar

Ramdas Athawale Statement on ST Reservation

काल (मंगळवार) केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गोव्यातील एसटी समाजाच्या आरक्षणबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यात खळबळ माजली. यावर नंतर आठवले यांनी खुलासा करत माफीदेखील मागितली.

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गोवा प्रदेशचे अध्यक्ष सतीश कोरगावकर यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, आठवले यांनी हे विधान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती पुरविल्याने केले.

त्यामुळे याची नैतिक जबाबदारी अध्यक्ष या नात्याने आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी एसटी समाजातील बांधव किंवा इतर नेत्यांनी गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन केले.

दरम्यान, यावरून विजय सरदेसाई यांनी मंत्री रामदास आठवले यांच्यावरही निशाणा साधला आहे. गोव्‍यात एसटी समाजाची लोकसंख्‍या कमी असल्‍याने विधानसभेत त्‍यांना आरक्षण मिळणे अशक्‍य, असे वक्‍तव्‍य करून नंतर केंद्रीय सामाजिक न्‍यायमंत्री रामदास आठवले यांनी काेलांटी मारली.

त्यावर सरदेसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना आठवले हे सामाजिक न्‍यायमंत्री की अन्‍यायमंत्री, असा सवाल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT