Adv. Ramakant Khalap  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : पर्रीकर की बांदोडकर; मोपाला कुणाचं नाव द्यायचं? खलपांनी स्पष्टच सांगितलं

मोपा विमानतळास कोणाचे नाव द्यावे यावरून तर्कवितर्क, त्याशिवाय विविध सूचना आणि वाद-विवाद व्यक्त होऊ लागले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ काही आठवड्यांत सेवेत रुजू होणार आहे. त्याआधीच आता या विमानतळास कोणाचे नाव द्यावे यावरून तर्कवितर्क, त्याशिवाय विविध सूचना आणि वाद-विवाद व्यक्त होऊ लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. रमाकांत खलप यांनी मोपा विमानतळास भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव द्यावे, अशी सूचना केलेली आहे. त्याशिवाय त्यांनी इतर तीन महनीय व्यक्तींची राज्यातील विविध प्रकल्पांना नावे द्यावीत, असे सुचविले आहे.

ॲड. खलप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गोवा मुक्तीचे हे 60 वे वर्ष आहे, तर देशाचे 75 वे स्वातंत्र्य वर्ष आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची आठवण राहावी यासाठी योग्य मार्ग असावा याकरिता त्यांची नावे राज्यातील विविध प्रकल्पांना द्यावीत. दयानंद बांडोडकर, शशिकला काकोडकर, विल्फ्रेड डिसोझा, मनोहर पर्रीकर, अनंत (बाबू) नायक हेही आता राहिलेले नाहीत.

खलप यांनी मोपा विमानतळाचे नाव दयानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ असावे, असे म्हटले आहे. शिवाय दाबोळी विमानतळास डॉ. जॅक सिक्वेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा विद्यापीठ संकुलास शशिकला काकोडकर नॉलेज सिटी म्हणून, गोवा विद्यापीठास मनोहर पर्रीकर लॉ स्कूल तसेच दिल्लीत संरक्षण संशोधन संस्था, मिरामार येथे त्यांचे समाधीस्थळ आहे. तसेच काणकोण बगल महामार्गालाही मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. त्याशिवाय गोवा वैद्यकीय महाविद्यालयास डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचे नाव द्यावे, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT