Ramakant Khalap  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Lok Sabha Election 2024: म्हापसा अर्बन बँक स्थापन केल्यानंतर या बँकेतून कर्ज देताना आम्ही सर्व ती खबरदारी घेतली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election 2024: म्हापसा अर्बन बँक स्थापन केल्यानंतर या बँकेतून कर्ज देताना आम्ही सर्व ती खबरदारी घेतली होती. योग्य सुरक्षा हमी घेऊनच कर्जे देत वसुली करत होतो. परंतु माजी मुख्‍यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून ही बँक आम्ही सर्व संचालक मंडळाने राजीनामा देऊन त्यांच्या हातात दिली. पर्रीकर यांनी पाच वर्षे ही बँक चालवली आणि तिची आज जी काही स्थिती आहे ती सर्वांसमोर आहे. ‘म्‍हापसा अर्बन’च्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकर हेच जबाबदार आहेत, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी केला.

साखळी येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत खलप बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महाराष्ट्रातील नेते संभाजीराव मोहिते, शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, ‘आप’चे राजेश कळंगुटकर, गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत, नगरसेवक प्रवीण ब्लेगन, माजी आमदार प्रताप गावस, सदानंद मळीक, माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, राजेश सावळ, सुनीता वेरेकर, साखळीचे गटाध्यक्ष मंगलदास नाईक, डिचोली गटाध्यक्ष मनोज नाईक, मयेचे गटाध्यक्ष बाबी च्यारी व इतरांची उपस्थिती होती. मागाहून आरोप करू नका, समोर या. मी आजही खुल्या मंचावर याबाबत चर्चेसाठी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी बिनधास्तपणे फाईल्स खुल्या कराव्यात. खलप कोणालाही घाबरत नाही, असेही खलप म्‍हणाले. भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवू नये, असेही ते म्‍हणाले.

भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आलाय : संभाजीराव मोहिते

देशाच्या विकासाला ग्राहण लावताना अनेक युवकांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले शिक्षण सांगता येत नाही. त्यांना आपल्या एखाद्या वर्गमित्राचे, शिक्षकाचे नावही सांगता येत नाही. अशी व्यक्ती आमचा पंतप्रधान आहे हे आमचे दुर्दैव आहे. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्या केवळ आदीवासी समाजातील महिला असल्यानेच बोलावण्यात आले नाही, असा आरोप संभाजीराव मोहिते यांनी केला. अशा प्रकारे जाती-धर्माच्या आधारे राजकारण करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. त्‍यामुळे यावेळी त्यांना जनता घरी पाठवून धडा शिकवणार आहे, असेही ते म्‍हणाले.

ॲड. रमाकांत खलप, काँग्रेस उमेदवार

मी मगो पक्षात असताना भाजप पक्ष नुकताच गोव्यात धडपडत होता. त्यावेळी भाजपचे आमदार निवडून यावेत यासाठी मी प्रयत्न केले. श्रीपाद नाईक यांना मडकई मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत मीसुद्धा प्रचार केला आहे. आपल्या पक्षाचा विरोध डावलून गोव्यात भाजपला मी बोट देऊन वर आणले व आज तेच माझ्‍याविरोधात बोलत आहेत.

काँग्रेस सभास्‍थळी भाजपची नारेबाजी

काँग्रेसची सभा सुरू असतानाच ‘ला तारा’ सभागृहाबाहेर प्रचार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या कृत्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी समाचार घेत, आमच्या सभास्थळी नारेबाजी करण्यापेक्षा सांकवाळ येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी २०१४, २०१९ साली निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍‍वासनांची आठवण का करून देत नाही? १५ लाख बँक खात्यावर येणार होते, या आश्‍‍वासनाचे काय झाले? गोव्याला विशेष दर्जा देण्याचा नारा कुठे विरला? २०१४ मध्‍ये केंद्रात भाजप सरकार स्थापन होताच तीन महिन्यांत खाणी सुरू करण्याच्या आश्‍‍वासन कोठे विरले? असे सवाल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT