Goa Ramadan food Dainik Gomantak
गोवा

Ramdan Food in Goa: गोव्यातील रमजान; इफ्तारसाठी प्रसिद्ध ठिकाणे आणि खास पदार्थ

Ramadan 2025 Goa: गोव्यात अस्सल इफ्तारचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी, अनेक ठिकाणे गजबजलेली आहे

Akshata Chhatre

Goa special Ramadan dishes: गोव्यात रमजान हा आध्यात्मिक आणि खाद्यपदार्थांच्या आनंदाचा एक अनोखा संगम आहे. रमजान सुरु असताना मुस्लिम लोकं महिनाभर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात. मुस्लिमांमध्ये उपवास सोडण्याची वेळ, इफ्तार याला धार्मिक महत्व आहे. हा पवित्र महिना अन्नाचे महत्त्व अधोरेखित करतो. या पवित्र महिन्यात अन्नाचे सेवन हे केवळ उपजीविकेसाठीच नाही तर सामाजिक बंध मजबूत करण्यात देखील महत्वाचे मानले जाते.

रमजानचे दिवस कसे असतात?

रंजन महिन्यात दिवसाची सुरुवात सुहूरने होते. यावेळी मुस्लिम धर्मीय पहाटेच्या आधीचे जेवण करतात. हे अन्न त्यांना संपूर्ण दिवसभर केल्या जाणाऱ्या उपवासासाठी ऊर्जा देते. सूर्य मावळताच, इफ्तारसाठी कुटुंबे आणि समुदाय एकत्र येतात. यावेळी पारंपारिक पदार्थ जसे की बिर्याणी, चवदार कबाब आणि गोड पदार्थ हे प्रमुख आकर्षण असतात. या अन्नातून दिवसभर केलेल्या उपासानंतर शरीराला आवश्यक असलेल्या साखरेची भरपाई केली जाते.

गोव्यात रमजानचे स्वादिष्ट पदार्थ कुठे खाल?

म्हापसा

गोव्यात अस्सल इफ्तारचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी, अनेक ठिकाणे गजबजलेली आहेत. म्हापसा येथील अफलातून नावाच्या हॉटेलमध्ये जामा मशिदीजवळ अस्सल रमजानच्या पदार्थांची चव घेता येते. रमजानच्यावेळी सूर्यास्तानंतर प्रत्येक अभ्यागताला इथे मोफत फळांचे वाटप केले जाते. शिश आणि शमी कबाब आणि मटण बिर्याणी स्थानिक लोकांचे आवडते पदार्थ आहेत.

पणजी

रमजानच्या काळात पणजीमध्ये, जामा मशीद एका गजबजलेल्या खाद्य बाजारात रूपांतरित होते. केटरर्स रशियन कटलेट आणि खीमा समोसापासून सफरचंद आणि गुलाबाच्या फ्लेवरमधील ताजेतवाने सरबतांपर्यंत सर्व काही खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे स्टॉल लावतात.

वास्को

भाईजान्स जॉइंट त्याच्या अद्वितीय अशा इफ्तार ऑफरसाठी प्रसिद्ध आहे. तंदुरी विंग्ज, बीबीक्यू स्टिक्स, तळलेले कबाब आणि त्यांची खास चिकन समोसा हे त्यांचे काही खास पदार्थ आहेत. येणारे ग्राहक खजूर, फालुदा किंवा सरबत पिऊन उपवास सोडतात. गोव्यातील रमजान म्हणजे केवळ उपवास नाही तर समुदाय, परंपरा आणि स्वादिष्ट अन्नाच्या देवाणघेवाणीचा उत्सव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT