Rama Kankonkar Assault Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: मास्टरमाईंड जेनिटोच की अन्‍य कोणी? गोव्यात चर्चेला उधाण; 'काणकोणकर' हल्लाप्रकरणी संशयितांना कोर्टात करणार उभे

Rama Kankonkar Attack: रामा काणकोणकर यांच्‍यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी अटकेत असलेला कुख्‍यात गुंड जेनिटो कार्दोज याला केवळ दोन दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड पोलिस मिळवू शकले.

Sameer Panditrao

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी अटकेत असलेला कुख्‍यात गुंड जेनिटो कार्दोज याला केवळ दोन दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड पोलिस मिळवू शकले. सर्व संशयितांना आता २४ सप्‍टेंबरला एकाच वेळी न्‍यायालयात हजर करण्यासाठी त्याला दोन दिवसांची कोठडी दिली असली तरी राज्यभरात तो चर्चेला विषय ठरला आहे.

या हल्ला प्रकरणात मुख्य सूत्रधार मानला जाणारा जेनिटो कार्दोज याला अटक करून आज सोमवारी मेरशी प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली. आता त्‍याला २४ सप्टेंबर रोजी अन्य संशयितांसह पुन्हा न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, काणकोणकर आपल्या जबानीतून कोणाकडे बोट दाखवतील याविषयी उत्सुकता आहे. त्यांची जबानी निर्णायक ठरणार आहे. त्‍यामुळे अनेकांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे.

१८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता करंझाळे येथे हा हल्ला झाला. त्यानंतर सोयरू वेळीप (४५, केपे) यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या तक्रारीनुसार, सहा अज्ञात संशयितांनी कट रचून रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. तसेच तक्रारदाराची सुरी दाखवून जीवे मारण्‍याची धमकी दिली.

गुन्ह्यानंतर केवळ तीन तासांत सीसीटीव्ही फुटेज व गुन्हेगारी रेकॉर्डच्या आधारे सहा मुख्य संशयित आरोपींची ओळख पोलिसांनी पटवली आणि २४ तासांच्या आत त्‍यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. त्‍यांच्‍यावर भारतीय न्यायदंड संहितेच्‍या २०२३ कलम १२६(२), १०९, ३५१(३) सहपठित कलम ६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

काणकोणकरांना मानसिक धक्का

जखमी रामा काणकोणकर यांची प्रकृती सध्या गंभीरच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना अंतर्गत मुका मार लागला आहे. त्‍यामुळे त्‍यांना झोप देखील येत नाही. डोळा लागलाच तर अचानक ते जागे होतात. झालेल्या गंभीर मारहाणीमुळे त्याच्या मनावर परिणाम झाला आहे. त्‍यामुळे अजून काणकोणकर यांची जबानी पोलिसांनी घेतलेली नाही.

मास्टरमाईंड जेनिटोच की अन्य कोणी?

‘आप’चे गोवा अध्यक्ष अमित पालेकर म्‍हणाले, या प्रकरणाचा मास्‍टरमाईंड जेनिटोच आहे की अन्य कोण, हे आता पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे आहे. मुळात पोलिसांनी जेनिटोला पकडले हीच मोठी बाब. पोलिसांना तपासासाठी आणखी वेळ देण्याची गरज आहे.

‘तपासासाठी पोलिसांना आणखी वेळ हवा’

या प्रकरणातील सूत्रधाराला शोधून काढण्यासाठी आम्ही पोलिसांना ४८ तासांची मुदत दिली होती. त्या कालावधीत त्यांनी जेनिटोला अटक केली. आता या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे की नाही, याचा तपास करण्यासाठी पोलिसांना आणखी वेळ दिला पाहिजे, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्‍यक्त करताना सांगितले.

काणकोणकरांचा जबाब अजून नोंद नाही

गेल्‍या गुरुवारी (१८ सप्‍टेंबर) करंझाळे-पणजी येथे सात जणांनी केलेल्‍या प्राणघातक हल्ल्‍यात गंभीर जखमी झालेल्‍या रामा काणकोणकर यांचा जबाब पोलिसांनी अजून नोंदवून घेतलेला नाही. बांबोळी येथील गोमेकॉत उपचार घेत असलेल्‍या काणकोणकर यांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाल्‍यानंतरच त्‍यांचा जबाब नोंदविला जाईल, अशी माहिती पोलिससूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

प्रकरणाच्‍या मुळापर्यंत जाणार : मुख्‍यमंत्री

रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्‍या मुळापर्यंत पोलिस जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. यासंदर्भात त्‍यांना प्रश्‍‍न विचारण्‍यात आला होता. त्‍यावर मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यातील गुन्‍ह्यांचा छडा लावण्‍याचे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजे ९२ टक्क्यांहून अधिक आहे.

मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या कोणाचीही कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही. गृहमंत्रालय आणि गोवा पोलिस दल दक्षतेने काम करत आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत सात ते आठ जणांना अटक करण्यात आली आहे. हल्‍ल्‍यामागील खरा सूत्रधार कोण, याबाबत तपास सुरू आहे. कोणालाही वाचवले जाणार नाही, असेही मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले.

मास्टरमाईंड जेनिटोच की अन्‍य कोणी?

मडगाव: रामा काणकोणकर यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणात पोलिसांनी कुख्यात गुंड जेनिटो कार्दोज याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या आहेत. मात्र तोच या हल्‍ल्‍यामागील खरा सूत्रधार आहे की कर्ता-करविता आणखी कोणी आहे? अशी प्रश्‍‍न विचारला जात आहे. सोशल मीडियावरही याबाबत चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनात सक्रिय असलेल्‍यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणखी वेळ देण्याची गरज आहे. त्‍यांच्‍या तपासात काय बाहेर येते ते पाहणे गरजेचे आहे, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codar IIT Projct: 'आयआयटी गोव्यात पाहिजेच, पण कोडारमध्ये नको'! वेळीपांचे प्रतिपादन; ‘उटा’ संघटनेचा ग्रामस्थांना पाठिंबा

MSRY Goa: मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेला मान्यता! CM सावंतांची माहिती; विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार, उद्योगाचे धडे

Horoscope: करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवनात मोठा बदल; 'या' राशींवर होणार देवी ब्रम्हचारीणीची कृपा

Valpoi: शेणावरून घसरून 2 विद्यार्थी जखमी भुईपाल रस्ता बनलाय गुरांचा अड्डा; अपघातांच्या संख्येत वाढ

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती'ने लावले कामाला, तांबोसेत गवत काढण्याचे काम सुरू; नजर ठेवण्यासाठी घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT