Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर प्रकरणात पणजी पोलिसांची मोठी कारवाई! मास्टरमाईंडच्या आवळल्या मुसक्या

Mastermind Geneto Cardozo Arrested: गोव्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पणजी पोलिसांनी आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या.
Rama Kankonkar Assault Case
Mastermind Geneto Cardozo ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पणजी पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणाचा मास्टमाईंड आणि अट्टल गुन्हेगार जेनिटो कार्दोझ (रा, सांताक्रूझ) याला पोलिसांनी पणजी येथील एका हॉटेलमधून अटक केली. या अटकेमुळे या प्रकरणातील गूढ उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान काही संशयित आरोपींनी (Accused) जेनिटो कार्दोझ याचे नाव घेतले. त्याच्या सक्रिय सहभागाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. जेनिटोच्या अटकेमुळे पोलिसांना या गुन्ह्यामागील संपूर्ण कट आणि हल्ल्याचे नेमके कारण समजण्यास मदत होईल, अशी पोलिसांना आशा आहे.

Rama Kankonkar Assault Case
Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात मोठी घडामोड! आणखी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कटाचा उलगडा होणार?

तपास आणि प्रतिबंधक अटक

रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यानंतर पणजीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अत्यंत सतर्कता बाळगली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन दिवसांत एकूण 23 जणांना प्रतिबंधक अटक केली. शनिवारी 11 जणांना प्रतिबंधक अटक करण्यात आली. तर रविवारी 12 जणांना प्रतिबंधक अटक करण्यात आली.

Rama Kankonkar Assault Case
Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर मारहाण प्रकरणी आंदोलक आक्रमक, अडवली दयानंद बांदोडकर रोडवरील वाहतूक; मांडवी पुलाजवळही वाहतूक ठप्प

गाड्यांची जप्ती आणि पुढील तपास

पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्यांचीही ओळख पटली आहे. या गाड्या उद्या (सोमवार, 22 सप्टेंबर) जप्त करण्यात येतील. यामुळे पोलिसांना आणखी पुरावे गोळा करण्यास मदत होईल. या प्रकरणातील प्रत्येक धागा जोडून संपूर्ण कट उघडकीस आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

गेल्या काही दिवसांपासून पणजी (Panaji) पोलीस या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने करत होते. जेनिटो कार्दोझ हा एक अट्टल गुन्हेगार असल्याने त्याला पकडणे हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते. पण, योग्य माहिती आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे पोलिसांना त्यात यश मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com