Rama Kankonkar  Dainik Gomantak
गोवा

‘तुला गोव्‍याचा राखणदार व्‍हायचे आहे का'? चाकू दाखवला, मारायला सुरुवात केली; हल्ल्‍यादिवशी नेमके काय घडले? काणकोणकरांनी दिला जबाब

Rama Kankonkar Statement: प्रकृती आणि मानसिक स्‍थिती ठीक नसल्‍यामुळे काही दिवस पोलिसांना जबाब देण्‍यास त्‍यांनी नकार दर्शवला होता. अखेर, गुरुवारी त्‍यांनी पोलिसांना जबाब दिला.

Sameer Panditrao

पणजी: ‘तुला गोव्‍याचा राखणदार व्‍हायचे आहे का?’, ‘तुला एसटी खाते हवे आहे का?’, ‘तुला खाप्रेश्‍‍वर हवा का?’, ‘आमच्‍या आमदाराचे नाव खराब करू नको’, असे म्‍हणत हल्लेखोरांनी मला केबल्‍सने मारहाण केली. मारहाण करताना जातीवाचक शिवीगाळही केली. एसटी समाजाचे प्रश्‍‍न मांडत असल्‍यामुळेच माझ्‍यावर प्राणघातक हल्ला करण्‍यात आला. हल्लेखारांमध्‍ये मिंगेलचाही समावेश होता, असा जबाब रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिला.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावर १८ सप्‍टेंबर रोजी करंझाळे–पणजी येथील एका हॉटेलबाहेर जीवघेणा हल्ला झाला होता. यात ते गंभीर जखमी झाल्‍याने त्‍यांना उपचारांसाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्‍यात आले.

प्रकृती आणि मानसिक स्‍थिती ठीक नसल्‍यामुळे काही दिवस पोलिसांना जबाब देण्‍यास त्‍यांनी नकार दर्शवला होता. अखेर, गुरुवारी त्‍यांनी पोलिसांना जबाब दिला. हल्ल्‍याच्‍या दिवशी नेमके काय घडले, याची सविस्‍तर माहिती दिली. दरम्‍यान, काणकोणकर यांच्‍यावर दिवसाढवळ्या झालेल्‍या हल्ल्‍यानंतर राज्‍यात खळबळ माजली होती.

काणकोणकर यांना न्‍याय मिळाला पाहिजे, या प्रकरणातील आरोपींना तत्‍काळ अटक करा, अशी मागणी करीत पणजीत तीव्र आंदोलनही छेडले होते. त्‍यानंतर पोलिसांनी पहिल्‍या दिवशी पाच जणांना, दुसऱ्या दिवशी दोघांना अटक केली होती. त्‍यांची चौकशी सुरू झाल्‍यानंतर काही संशयितांनी अट्टल गुन्‍हेगार जेनिटो कार्दोजो याच्‍या सांगण्‍यावरून रामा काणकोणकरवर आपण हल्ला केल्‍याचे पोलिसांना सांगितले.

मिंगेलने दोनदा दिली होती कारला धडक

खाप्रेश्‍‍वर मंदिराच्‍या स्‍थलांतराला विरोध केल्‍यानंतर माझ्‍याविरोधात गुन्‍हा दाखल झालेला होता. त्‍या प्रकरणात जामीन मिळाल्‍यापासून मिंगेल माझ्‍यामागे लागला होता. या प्रकरणाच्‍या दोन ते तीन दिवसांनंतर बांबोळी येथील नर्सिंग कॉलेज परिसरात मिंगेल याने आपल्‍या कारने माझ्‍या कारला मागून धडक दिली होती. त्‍यानंतर काहीच दिवसांनी त्‍याने पुन्‍हा तीच कृती केलेली होती, असेही रामा काणकोणकर यांनी जबाबात नमूद केले आहे.

जबाबात काय म्हणाले रामा...

१.मी आणि माझा मित्र सोयरु वेळीप १८ सप्‍टेंबर रोजी दुपारी करंझाळे येथील एका हॉटेलमध्‍ये जेवण्‍यासाठी गेलो होतो. तेथे माझ्‍या टेबलसमोर बसलेल्‍या एका व्‍यक्तीने मोबाईलद्वारे फोटो काढला. त्‍यानेच नंतर ‘मी तुझा नाही, मेन्‍यूचा फोटो काढला’ असे सांगितले. परंतु, मी त्‍याकडे दुर्लक्ष केले. जेवण झाल्‍यानंतर मी आणि सोयरू हॉटेलबाहेर पडलो. काहीच अंतरावर गेल्‍यानंतर एका व्‍यक्तीने प्रथम माझ्‍यावर हल्ला चढवला.

२.त्‍यानंतर तेथे दोन ते तीन जण आले. त्‍यावेळी मिंगेलने मला चाकू दाखवला. या सर्वांनी मला केबल्‍सने मारण्‍यास सुरुवात केली. तोंड, पोट तसेच इतर ठिकाणी जबर मारहाण केली. मारहाणीत मी गंभीर जखमी झालो.

३. मिंगेल आणि इतर हल्लेखोरांनी मारहाण करीत असताना मला ‘गावडा’ संबोधत जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तुला गोव्‍याचा राखणदार व्‍हायचे आहे का?’, ‘तुला एसटी खाते हवे आहे का?’, ‘तुला खाप्रेश्‍‍वर हवा का?’, ‘आमच्‍या आमदाराचे नाव खराब करू नको’, अशा प्रकारची वक्तव्‍ये त्‍यांनी केली.

४. मी गंभीर जखमी झाल्‍यानंतर त्‍यांनी मला उचलून फेकले आणि दुचाकीने घटनास्‍थळावरून पळ काढला. यातील मिंगेल याने याआधी दोनवेळा माझ्‍यावर हल्ला करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. ती प्रकरणे पोलिस स्‍थानकापर्यंतही गेली होती. त्‍यामुळे मी त्‍याला नावानुसार ओळखत होतो. १८ सप्‍टेंबर रोजीच्‍या हल्ल्‍यातही त्‍याचा सहभाग होता. इतर संशयितांना समोर आणल्‍यास मी त्‍यांना ओळखू शकतो. परंतु, त्‍यांची नावे आपल्‍याला माहित नसल्याचे रामाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Leopard In Goa: ..पुन्हा बिबट्याची डरकाळी! डिचोली परिसरात दहशत; रात्री रस्त्यांवर शुकशुकाट

Vasco Accident: टेम्पो-मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात, दोन्‍ही चालक जखमी; वाहतूक काही काळ ठप्प

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Goa Live News: "पक्षासाठी नाही तर गोव्यासाठी काम"

SCROLL FOR NEXT