Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: 'रामाच्या 'बोलवत्या धन्या'ला शोधा', खासदार तानावडेंचा रोखठोक पवित्रा; म्हणतायत, "हे आरोप निराधार"

Tanavade on Kankonkar case: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्यावर हल्ला प्रकरणावरून केलेले आरोप निराधार असल्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले

Akshata Chhatre

पणजी: काणकोणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तपासाच्या सुरुवातीपासून वारंवार आपले जबाब बदलले असल्याने, असे दावे करण्यामागील हेतू काय? याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी तानावडे यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकरयांनी गोमेकॉ रुग्णालयातून उपचारानंतर परतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्यावर हल्ला प्रकरणावरून केलेले आरोप निराधार असल्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही

भाजपचे खासदार तानावडे म्हणाले की, या प्रकरणाचा तपास आतापर्यंत कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निष्पक्षपणे करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन रामाची भेट घेतली, त्याला पोलीस संरक्षण दिले आणि चौकशीसाठी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. असे असतानाही रामाने आमचे नाव घेण्याचे कारण काय आणि त्याला हे बोलण्यासाठी कोणी प्रवृत्त केले याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी पर्यटनमंत्र्यांनी केली होती, ज्याला तानावडे यांनी दुजोरा दिला आहे आणि तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसून पोलीस पूर्ण मोकळेपणाने काम करत आहेत, अशी ग्वाही तानावडे यांनी दिली आहे.

सरकारची बदनामी करण्याचे प्रयत्न

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खावंटे यांनीही यापूर्वी काणकोणकरांचे आरोप 'सरकारची बदनामी करण्याचे आणि राजकीय रंग देण्याचे प्रयत्न' असल्याचे सांगत पलटवार केला होता.

"रामावर २३ दिवस उपचार सुरू होते आणि दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी त्याची भेट घेतली होती. हा मुद्दासुद्धा चौकशीचा भाग असावा." एवढे दिवस कधीच नाव न घेतलेल्या रामाने डिस्चार्ज मिळाल्यानंतरच नावे का घेतली, याची कसून चौकशी झाली पाहिजे, असे पर्यटनमंत्री रोहन खवंटे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..किनारे वाचवा'! मुंबईच्या विद्यार्थिनीने पार केला गोव्याचा समुद्र; कुठ्ठाळी ते मिरामार पोहून राबवली Swim for Sea मोहीम

Goa Today Live Updates: मोपावरुन नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरु होणार!

'डिचोलीत पर्यटन सर्किट उभे राहिल'! श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण सुरु; CM सावंतांची उपस्थिती

Blackbuck Death: धक्कादायक! 1 नाही 2 नाही... 28 काळविटांचा मृत्यू! राज्यात पहिल्यांदाच असा संसर्ग, वनमंत्र्यांनी दिले कठोर चौकशीचे आदेश

Canacona Water Problem: 8 दिवस पाण्याची टंचाई! ग्रामस्थांनी घातला सहाय्यक अभियंत्याला घेराव; मास्तीमळ येथे पाणीप्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT