Rama Kankonkar assualted Dainik Gomantak
गोवा

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Rama Kankonkar Attack Video: व्हिडिओत अज्ञातांनी काणकोणकरांना अक्षरश: गुरासारखी मारहाण केल्याचे दिसत आहे.

Pramod Yadav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकरांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१८ सप्टेंबर) उघडकीस आली. पाच ते सहा जणांनी वायर आणि रॉडच्या मदतीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात काणकोणकर गंभीर जखमी झाले आहेत.

करंजाळे येथे दुपारी ही घटना घडली. काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

रामा काणकोणकरांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओत पाच ते सहाजण त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. काणकोणकरांना जमिनीवर पाडून पाय घट्ट पकडून चारजण त्यांना मारहाण करताना दिसत आहेत.

त्यानंतर पायाला ओढून त्यांची कपडे फाडण्यात आली. काणकोणकरांवर सातत्याने प्रहार करताना दिसत आहेत. मारहाणीत काणकोणकर वेदनेने ओरडाना दिसत आहेत.

व्हिडिओत अज्ञातांनी काणकोणकरांना अक्षरश: गुरासारखी मारहाण केल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी त्यापैकी एकजण हा सर्व प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करताना दिसत आहे.

मारहाण करुन विव्हळत पडलेल्या काणकोणकरांना त्याच ठिकाणी सोडून हल्लेखोर दुचाकीवर बसून फरार झाल्याचे दिसत आहे. करंजाळे परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामा काणकोणकर सामाजिक कार्यकर्ते असून, विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतात. काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.

पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरु आहे. जखमी काणकोणकरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काणकोणकर यांच्यावर कोणी आणि का हल्ला केला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT