rama kankonkar news Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: "रामाच्या तोंणान ही उतरां घातली कोणें?", 23 दिवस शांत, मग अचानक काय झालं? आरोपांवर खवंटेंचा पलटवार

rohan khaunte statement on rama: पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या विधानाला दुजोरा देत आपले मत मांडले आहे

Akshata Chhatre

पणजी: गोमेकॉ रुग्णालयातून उपचारानंतर घरी परतलेल्या सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खावंटेयांच्यावर हल्ला प्रकरणातील आरोपांची सुई वळवल्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच हे 'सरकारची बदनामी करण्याचे आणि राजकीय रंग देण्याचे प्रयत्न' असल्याचे सांगून काणकोणकरांवर पलटवार केला होता, त्यानंतर आता पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या विधानाला दुजोरा देत आपले मत मांडले आहे.

'२४ तासांत अटक, मग आमचं नाव कशासाठी?'

रामा काणकोणकर यांनी केलेल्या आरोपांविषयी प्रश्न विचारला असता पर्यटनमंत्री रोहन खवंटे म्हणाले की, रामावर २३ दिवस उपचार सुरू होते. पोलिसांनी पहिल्यांदा जबाब नोंदवला तेव्हा संशयितांना २४ तासांच्या आत अटक करण्यात आली होती. "मग आता उपचार पूर्ण झाल्यानंतर माझं किंवा मुख्यमंत्री सावंत यांचं नाव पुढे करण्याचं नेमकं कारण काय?" असा थेट सवाल खावंटे यांनी केला.

खवंटे यांनी काणकोणकरांच्या निडर स्वभावाचा उल्लेख करत म्हटले की, "रामावर जर आम्ही हल्ला चढवला असता, तर त्याने सुरुवातीलाच आमची नावे पुढे करायला पाहिजे होती, कारण रामा काणकोणकर हा तेवढा सरळ बोलणारा आणि निडर माणूस नक्कीच आहे."

आरोपांमागे 'कोणाची फूस'? चौकशीची मागणी

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन रामाची भेट घेतली, चौकशी केली, त्याला आवश्यक असलेले पोलीस संरक्षण दिले, तसेच त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी घराबाहेर पोलीस तैनात केले होते. एवढे सारे सहकार्य मिळत असतानाही रामाने आमचे नाव घेण्याचे नेमके कारण काय? आणि त्याला हे बोलण्यासाठी नेमके कोणी प्रवृत्त केले? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी पर्यटनमंत्र्यांनी केली.

पर्यटनमंत्री खवंटे यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले: "रामावर २३ दिवस उपचार सुरू होते आणि दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी त्याची भेट घेतली होती. हा मुद्दासुद्धा चौकशीचा भाग असावा." एवढे दिवस कधीच नाव न घेतलेल्या रामाने डिस्चार्ज मिळाल्यानंतरच नावे का घेतली, याची कसून चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

Rama Kankonkar: 'रामाच्या 'बोलवत्या धन्या'ला शोधा', खासदार तानावडेंचा रोखठोक पवित्रा; म्हणतायत, "हे आरोप निराधार"

Relationship Bonding: फक्त ओठांचा स्पर्श नाही! '6 सेकंदांचा किस' कसा वाढवतो नात्यातील जवळीक? संशोधन सांगतंय बॉंडिंगचा फंडा

Shubman Gill Catch: फलंदाजीत शतक, फिल्डिंगमध्ये 'सुपरमॅन'; हवेत उडी घेत गिलने टिपला अविश्वसनीय झेल, VIDEO पाहून व्हाल थक्क

गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! काही तासांतच शोधून दिलं बेळगावच्या महिलेचं 4.5 लाखाचं 'मंगळसूत्र', बागा येथील घटना

SCROLL FOR NEXT