Rama Kankonkar  Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: काणकोणकर हल्लाप्रकरणी सूत्रधार कोण? PM मोदींना देणार निवेदन; पोलिसांची ‘रासुका’ लावण्यासाठी हालचाल

Rama Kankonkar Case Updates: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर मारहाण प्रकरणातील संशयितांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर मारहाण प्रकरणातील संशयितांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिस दलाकडून तसा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रासूकाचा वापर करण्यासाठी तो कायदा लागू केल्याची अधिसूचना जारी करावी लागते. त्यामुळे तसा प्रस्ताव पोलिसांनी गृह खात्याच्या विचारार्थ सादर केला आहे. सरकारने त्याला मान्यता दिल्यानंतर गृह खात्याकडून तशी अधिसूचना जारी केली जाईल त्यानंतरच रासुकांतर्गत कारवाईचे अधिकार पोलिस दलाला मिळणार आहेत.

दुसरीकडे रामा यांना न्याय देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एकवटू लागले आहेत. मडगाव, काणकोणनंतर आता म्हापशात यासाठी सारेजण एकवटणार आहेत. चोडण बेटावरही उद्या सायंकाळी ७ वाजता मेणबत्ती फेरी काढण्यात येईल.

उत्तर गोव्यातील इतर शहरांतही अशा सभा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राज्यात सुरक्षित नाहीत असे चित्र यानिमित्ताने रेखाटण्यात येत आहे.

पणजीत आज सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत काणकोणकर मारहाणप्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण अशी जाहीर विचारणा केली.

काणकोणकर यांच्यावर झालेल्या भीषण हल्ल्याला दहा दिवस उलटून गेले तरीही पोलीस अद्याप सूत्रधाराची ओळख पटवू शकलेले नाहीत. आठ संशयितांना अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात सातत्याने दबाव ठेवला असून, हल्ल्याचा सूत्रधार तातडीने गजाआड करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तपासात अडथळे निर्माण होत असल्याची शंका व्यक्त करत त्यांनी राज्यपाल आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

सामाजिक कार्यकर्ते तनोज अडवलपालकर यांनी स्पष्ट केले की, सुरुवातीला पोलिसांनी संशयितांना पकडले तेव्हा आम्ही समाधानी होतो.

पण आता तपासावर राजकीय दबाव येत असल्याची शंका वाटते. गोव्याच्या जनतेला खरा सूत्रधार कोण आहे हे ठाऊक आहे. आज रामा काणकोणकर आहेत, उद्या अन्यायाविरोधात बोलणारा कुणीही निशाणा बनू शकतो.

शंकर पोळजी सांगितले की, यापूर्वीही कार्यकर्त्यांवर हल्ले झाले; पण काणकोणकरांवरील हल्ला हा प्राणघातक होता तर फिडॉल परेरा यांनी पोलिसांवर थेट टीका करत, संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवून पोलीस काय सिद्ध करू इच्छितात? आम्ही मूर्ख नाही. खरा सूत्रधार कोण आहे हे तातडीने उघड करावे, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Editorial: आता हद्द झाली...! संपादकीय

Goa Rain: पावसाचा धुमाकूळ कायम! पुढील चार दिवस गडगडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा

Mormugao Municipal Election: मुरगाव पालिका प्रभागवाढ ठरणार लक्षवेधी, विद्यमान नगरसेवकांच्या धावपळीला ब्रेक; आरक्षणावर अनेकांची नजर

Harmal Panchayat Issue: आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाची दुर्दशा! हरमलमधील भटवाडी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालक आणि ग्रामस्थ हैराण

Papaya Cultivation Goa: पपई उत्पादनात राज्यात फोंडा तालुका अग्रेसर! कृषी अहवालातून खुलासा, 155 हेक्टर क्षेत्रात 2583 टन उत्पादन

SCROLL FOR NEXT