काणकोण: ‘रामा काणकोणकर यांच्या मारहाणीमागील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आदिवासी समाजाचे कल्याण करणारा भारतीय जनता पक्ष नाही, हेच आजपर्यंतच्या सिद्ध झाले आहे. परंतु याच समाजाचे काही मंत्री ताटाखालची मांजरे बनले आहेत’, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काणकोण येथे केला.
रामा काणकोणकर यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय जाहीर सभेत ते बोलत होते. सरकारला आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. मुख्यमंत्री सावंत हे सदोदित सांगत आले आहेत की, भिवपाची गरज ना!
वास्तवात गुंड निर्धास्त झालेत आणि सामान्य जनता घाबरली आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते मोहनदास लोलयेकर नोंदवले. श्रीस्थळ पंचायत सभागृहात बोलाविलेल्या या जाहीर सभेला प्रशांत नाईक व अन्य नेते उपस्थित होते.
सांगेचे नगरसेवक डिकॉस्टा, पिटर फर्नांडिस, राजन घाटे या सामाजिक कार्यकर्त्यांनी रामा काणकोणकरांवर हल्ल्याचा निषेध केला. दत्ता गावकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन विकास भगत यांनी केले. यावेळी काँग्रेसचे गास्पर कुतिन्हो, आम आदमी पार्टीचे नेते उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सामान्यांना मुक्त वातावरण हवे आहे, दहशत नको, असे सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.