खरा ‘मास्टर माइंड’ मोकाट, अटक केलीये ते भाडोत्री गुंड! वेन्झींचे आरोप; गोवा बंद करण्याचा दिला इशारा

Venzy Viegas: काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मास्टर माईंडला त्वरित अटक करा, अन्यथा सर्व घटकांना विश्वासात घेऊन गोवा बंद करू, असा इशारा ‘आप’चे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी दिला.
Venzy Viegas
Venzy ViegasDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रामा काणकोणकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील मास्टर माईंडला त्वरित अटक करा, अन्यथा सर्व घटकांना विश्वासात घेऊन गोवा बंद करू, असा इशारा ‘आप’चे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी दिला.

काणकोणकर यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मडगावात पालिका उद्यानासमोर मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आम्ही गुंडगिरी खपवून घेणार नाही. ज्यांना अटक केली आहे ते भाडोत्री गुंड आहे.

Venzy Viegas
Rama Kankonkar: '..तर गोमेकॉबाहेर खाट घालून उपचार करु'! काणकोणकरांच्या डिस्‍चार्जबाबत कार्यकर्ते अस्‍वस्‍थ; निर्णयावरुन संशय

खरा ‘मास्टर माइंड’ अजून मोकाट आहे. त्याला कधी पकडणार, असा सवालही व्हिएग्स यांनी केला. सर्वानी एकत्र येऊन गोवा सांभाळण्यासाठी लढा द्यावा व २०२७ साली या सरकारला घरी पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Venzy Viegas
Rama Kankonkar: मास्टरमाईंड जेनिटोच की अन्‍य कोणी? गोव्यात चर्चेला उधाण; 'काणकोणकर' हल्लाप्रकरणी संशयितांना कोर्टात करणार उभे

वाल्मिकी नाईक यांनी सरकारने सर्व हद्द पार केली असून मारेकऱ्यांना अटक केल्याचे भाजप पत्रकार परिषदेत सांगते मात्र खरा मास्टर माइंड अजूनही पकडलेला नाही. लोकांची हे सरकार दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. जेरसन गोम्स, संदेश तेलेकर व इतरांचीही यावेळी भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com