GST Rates: गोव्‍यात 117 दुकानांची प्रत्‍यक्ष पाहणी, विक्रेत्‍यांनी लावले फलक; जीएसटी कपातीच्‍या निर्णयाची होतेय अंमलबजावणी

GST Reforms: सर्व दुकानदारांनी जीएसटी कपातीनंतरच्‍या सुधारित दरांनुसार वस्‍तूंची विक्री सुरू केली आहे. नियमाचे उल्लंघन झाल्‍याची एकही तक्रार आतापर्यंत नोंद झालेली नाही.
Goa GST revenue May
GST collection comparison GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकारच्‍या जीएसटी कपातीच्‍या निर्णयाची सोमवारपासून गोव्‍यासह देशभर अंमलबजावणी सुरू झाल्‍यानंतर राज्‍य कर खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्‍यभरातील ११७ दुकानांची प्रत्‍यक्ष पाहणी केली.

या सर्व दुकानदारांनी जीएसटी कपातीनंतरच्‍या सुधारित दरांनुसार वस्‍तूंची विक्री सुरू केली आहे. नियमाचे उल्लंघन झाल्‍याची एकही तक्रार आतापर्यंत नोंद झालेली नाही, अशी माहिती राज्‍य कर खात्‍याचे अतिरिक्त आयुक्त विशांत गावणेकर यांनी दिली.

काहीच दिवसांपूर्वी झालेल्‍या जीएसटी परिषदेच्‍या बैठकीत जीवनावश्‍यक वस्‍तू, वाहने तसेच इतर काही वस्‍तूंवरील जीएसटी कमी करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. या निर्णयाची सोमवारपासून देशभर अंमलबजावणीही सुरू झाली.

जीएसटी कपातीमुळे वस्‍तूंचे दर कमी होऊन त्‍याचा फायदा जनतेला मिळणार असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्‍पष्‍ट केले. तरीही विक्रेत्‍यांमध्‍ये याबाबत संभ्रम पसरलेला होता. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही सोमवारी पणजीतील अनेक दुकानांना भेट देऊन केंद्राच्‍या निर्णयाचा विक्रेत्‍यांवर परिणाम होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

Goa GST revenue May
GST Rates: 'जीएसटी' दरकपात लागू करा, अन्‍यथा कारवाई करु! करखात्‍याचा इशारा; परिपत्रक जारी

दरम्‍यान, जीएसटी कपातीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच राज्‍य कर खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी पणजीतील १९, पेडणेतील ७, डिचोलीतील १२, म्‍हापशातील ११, मडगावातील ३०, फोंड्यातील १४, कुडचडेतील ९ आणि वास्‍कोतील १५ दुकानांना भेटी दिल्‍या. यात जीवनावश्‍यक वस्‍तू, मेडिकल, सिमेंट आदींसारख्‍या दुकानांचा समावेश होता.

Goa GST revenue May
GST Reforms 2025: 'आजपासून जीएसटीचे नवे दर लागू'; खाद्यपदार्थ, कपडे ते फ्रीजसह रोजच्या वापरातील 'या' वस्तू झाल्या स्वस्त

काही दुकानदारांनी लावले फलक

जीएसटी कपातीमुळे वस्‍तूंचे दर घटल्‍याची माहिती देणारे फलक काही विक्रेत्‍यांनी दुकानांबाहेर लावलेले आहे. कोणत्‍या वस्‍तूवर पूर्वी किती जीएसटी होता आणि आता तो किती झाला आहे, याची माहिती या फलकांमुळे ग्राहकांना मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com