Chhatrapati Shivaji Maharaj Dainik Gomantak
गोवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उद्या डिचोलीत होणार रॅली

शिवप्रेमींतर्फे येत्या शनिवारी डिचोलीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: शिवप्रेमींतर्फे येत्या शनिवारी डिचोलीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पाजवाडा येथील श्री दत्तात्रय मंदिराकडून सकाळी 9 वा. दुचाकी रॅलीला सुरवात होणारआहे.

शहरात रॅली काढल्यानंतर येथील जुन्या बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होणार आहे. समारोप सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत उपस्थित राहणार आहेत.

रॅलीमध्ये शांतादुर्गा विद्यालया समोरील सर्कलवरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. नंतर शारदा नगर आणि शेवटी जुन्या बसस्थानकावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT