Goa Illegal Project Canva
गोवा

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Bhutani Project: सरकारने भूतानीचा हा प्रकल्प रद्द न केल्यास यापुढे आणखी मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रॅलीमध्ये देण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

Protest Against Bhutani Infra Project Sancoale

वास्को: भूतानी प्रकल्पाच्या विरोधात सांकवाळ येथे काढलेल्या या रॅलीत कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, माजी मंत्री एलिना साल्ढाणा, ॲड. प्रतिमा कुतिन्हो, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक, आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यासह इतरांनी भाग घेतला. पर्यावरणाचा ऱ्हास केल्यास राज्यात वायनाडसारख्या नैसर्गिक आपत्तीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, असा गर्भित इशारा रॅलीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी दिला.

सरकारने राज्यातील जनतेला गृहीत धरू नये. जनतेने ठरविल्यास राज्यात होत असलेल्या सर्व मेगा प्रकल्पांविरोधात आक्रोश वाढू शकतो. सरकारने जनतेच्या हितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य जनतेचा भाजप सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

...अन्यथा आंदोलन

राज्यातील भाजपचे सरकार डोंगर, वनक्षेत्र, शेतजमीन दिल्लीतील भूमाफियांना विकत असल्याने आज सरकारविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. सरकारने भूतानीचा हा प्रकल्प रद्द न केल्यास यापुढे आणखी मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रॅलीमध्ये देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT