Bhutani Infra: ...तर गोव्याचा अंत निश्‍चित! ‘भूतानी’वरुन पर्यावरणप्रेमी संतप्त

Bhutani Project: या प्रकल्‍पाच्‍या मान्‍यतेमागे मंत्री गुदिन्‍हो यांचा हात आहे का, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे
Bhutani Project: या प्रकल्‍पाच्‍या मान्‍यतेमागे मंत्री गुदिन्‍हो यांचा हात आहे का, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे
Goa Illegal ProjectCanva
Published on
Updated on

Bhutani Infra Project

मडगाव: भूतानी प्रकल्‍पाला आम्‍ही २०१२ पासून विरोध करीत आहोत. मात्र, मुरगाव पीडीए आणि सांकवाळ पंचायत या प्रकल्‍पाला पाठिंबा देत आहे. आम्‍ही हा प्रश्न ग्रामसभेत उपस्‍थित करण्‍याचा प्रयत्‍न केला; पण उपसरपंच गिरीश पिल्‍ले यांनी हा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित करू दिला नाही.

पिल्‍ले हे मंत्री माविन गुदिन्‍हाे यांचे उजवे हात मानले जातात. त्‍यामुळे या प्रकल्‍पाच्‍या मान्‍यतेमागे मंत्री गुदिन्‍हो यांचा हात आहे का, असा सवाल पर्यावरणप्रेमी नारायण नाईक यांनी उपस्थित केला आहे.

Bhutani Project: या प्रकल्‍पाच्‍या मान्‍यतेमागे मंत्री गुदिन्‍हो यांचा हात आहे का, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे
Bhutani Infra: ..चुका करणाऱ्यांची गय नाही; ‘भूतानी’वरुन मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर

...तर गोव्याचा अंत निश्‍चित

गोवा फाऊंडेशनचे (Goa Foundation) संचालक क्लॉड अल्वारिस म्हणाले की, डीएलएफ आणि ‘भूतानी’ला हे प्रकल्प पुढे रेटण्यास मिळाले, तर गोव्याचा अंत निश्‍चित आहे. हा ग्रामीण गोव्याचाही अध:पात आहे. कारण हे ग्राम्यजीवन स्थानिकांनीच वृद्धिंगत केले आहे. स्थानिकांच्या विरोधात जाऊन निसर्ग व पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा कोणालाही अधिकार नाही. दोषी अधिकाऱ्यांना घरी पाठवावे व राजकारण्यांनी - ज्यांनी या मान्यता दिल्या, त्यांनाही पायउतार व्हावे लागणार आहे.

गोवा बचाव आंदोलनाने काल बैठक घेऊन भूरूपांतराविरोधातील आपले तीव्र आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांच्या विरोधातही आम्ही जहाल भूमिका घेणार आहोत. तत्पूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे. सबिना मार्टिन्स, निमंत्रक, जीबीए

सबिना मार्टिन्स, निमंत्रक, जीबीए

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com