Ghumat Aarti Competition  Dainik Gomantak
गोवा

Goa Competition: युवावर्गाने गोमंतकीय कला जपावी!

राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धेचे उद्‍घाटन नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

गोमंतकीय संस्कृती जपण्यासाठी विविध स्पर्धा आयोजनात युवावर्गाने भाग घेताना आपल्या अंगभूत कलेला वाव द्यावा व गोमंतकीय कला जपावी, असे आवाहन फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी केले. फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धेचे उद्‍घाटन काल कलामंदिरातील मास्टर दत्ताराम सभागृहात नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रसिद्ध लोककलाकार रामकृष्ण वेलिंगकर तसेच कला मंदिरच्या सदस्य सचिव स्वाती दळवी उपस्थित होत्या.

रितेश नाईक म्हणाले की, गोमंतकीय कला संस्कृती जपली पाहिजे. विशेष म्हणजे अभ्यासक्रमाबरोबरच विविध तऱ्हेच्या कलेच्या क्षेत्रातील स्पर्धा उपक्रमांनाही नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या अंगभूत कलेचे प्रदर्शन करून या शैक्षणिक धोरणाद्वारे जाहीर करण्यात येत असलेले गुण संपादन केल्यास त्यांचे भवितव्य उज्ज्वल बनू शकते.

कलेचे सादरीकरण करताना शिस्तही तेवढीच महत्त्वाची असून शिस्तीशिवाय यश संपादन करणे कठीण आहे. राजीव गांधी कलामंदिरने एक खूप चांगला उपक्रम आखून विद्यार्थी व युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने गोमंतकीय कलेला निश्‍चितच बहर येईल. स्वागत व प्रास्ताविक सदस्य सचिव स्वाती दळवी यांनी केले, तर गिरीश वेळगेकर यांनी आभार मानले.

राजीव गांधी कलामंदिरच्या या राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धेत पुरुष, महिला व बालगट मिळून एकूण 74 पथके सहभागी झाली आहेत. पुरुष गटाची यंदाची ही चौदावी स्पर्धा असून त्यात 37 पथके सहभागी झाली आहेत. महिला गटाची यंदाची तिसरी स्पर्धा असून 21 पथके सहभागी झाली आहेत, तर यंदा प्रथमच बाल गटाची घुमट आरती स्पर्धा घेण्यात येत असून त्यात 16 पथके सहभागी झाली आहेत.

आमदार रवी नाईक यांनी दिली चालना: फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिर उभारण्यासाठी फोंड्याचे विद्यमान आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी चालना दिल्याची आठवण फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी करून दिली. फोंड्यातील कलामंदिरानंतर राज्यात विविध ठिकाणी कलामंदिरे व रवींद्र भवन साकारण्यात आली.

राज्यात खास कला व संस्कृती खात्याची निर्मितीही रवी नाईक यांनी केल्यामुळे गोमंतकीय कलेला प्रोत्साहन मिळाले. वास्तविक घुमट तसेच इतर लोककलेशी संबंधित स्पर्धाही रवी नाईक यांनीच सुरू केल्यामुळे युवा वर्गाला व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचेही रितेश नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT