Colvale Land Scam
Colvale Land Scam Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणी राजकुमार मैथीला पुन्हा अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या राजकुमार मैथी याला गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दुसऱ्या गुन्ह्यात सोमवारी अटक केली. पोलिस अधीक्षक निधीन वालसन यांनी मैथीचा त्यांच्या पथकाद्वारे तपास सुरू असलेल्या दुसऱ्या जमीन हडप प्रकरणात सहभाग असल्याचा दुजोरा दिला असून त्याची सध्याची अटक आसगावातील सर्व्हे क्रमांक 33/3 असलेल्या त्याच्या मालमत्तेबाबत आहे. याबाबत नेव्हिल डिसोझा यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मैथीला मंगळवारी पोलिस कोठडीसाठी म्हापसा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग (जेएमएफसी) यांच्यासमोर हजर करण्यात आले.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रॉयसन रॉड्रिगीस आणि सँड्रिक फर्नांडिस यांना आसगावातील सर्व्हे क्रमांक 223/7 च्या मालमत्तेवर आणखी एक फसवणूक केल्याप्रकरणी 19 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सहा दिवसांच्या कोठडीत चौकशी पूर्ण केल्यानंतर तिघांना जामीन मिळाला होता. मैथीच्या पुन्हा अटकेमुळे गोव्यातील मोठ्या प्रमाणात जमीन फसवणुकीचा आणखी पर्दाफाश होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.

या घोटाळ्याप्रकरणी एसआयटीने आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार मुहम्मद सुहेल आणि त्याची पत्नी अंजुम शेख यांच्यासह सर्व आरोपी सशर्त जामिनावर आहेत. विशेष म्हणजे सर्व आरोपींची पहिली कोठडी संपल्यानंतर लगेचच त्याना जमीन मिळाला आहे. या घोटाळ्यात पुन्हा अटक झालेला मैथी हा पहिला आरोपी आहे.

एसआयटीने आरोपींविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआर व्यतिरिक्त अनेक डझन तक्रारींची तपासणी करताना सुमारे 100 मालमत्ता जमीन फसवणुकीची प्रकरणे पुढे आली आहेत.

एकाही मंत्र्याचा सहभाग नाही : मुख्‍यमंत्री

गेल्‍या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर हे ‘ राज्‍य सरकारमधील एक मंत्री जमीन हडप प्रकरणात आहे. त्‍याला डच्‍चू द्या’, अशी सातत्‍याने मागणी करत आहेत. त्‍यावर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी स्‍पष्‍टीकरण दिले आहे. ‘माझा एकही मंत्री जमीन हडप प्रकरणांमध्‍ये सहभागी नाही. गिरीश चोडणकर यांनी आरोपबाजी करण्‍यापेक्षा आपल्‍याकडील पुरावे ‘एसआयटी’कडे सादर करावेत’, असे आव्‍हान त्‍यांनी दिले आहे.

जमीन हडप प्रकरणी ‘एसआयटी’कडून नवी प्रकरणे समोर आणली जात आहेत. मात्र, आतापर्यंत ज्‍यांना पकडण्‍यात आले, त्‍यांना जामीन मिळाला असल्‍याने या कारवाईबाबत नाराजीही व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. काँग्रेस नेत्‍यांनी जमीन हडप प्रकरणात एक मंत्रीही आहे, असे आरोप केले आहेत. त्‍यावर मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील खुलासा करत चोडणकर यांना आव्‍हान दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT