Rajinikanth honoured at IFFI | Rajinikanth 50 years in cinema | Rajinikanth special award Dainik Gomantak
गोवा

Rajinikanth Honoured at IFFI: इफ्फीत थलैवा 'रजनीकांत' यांचा होणार विशेष सन्मान! चित्रपट प्रवासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल गौरव सोहळा

Rajinikanth 50 years in cinema: चित्रपट प्रवासाची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा यंदाच्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आपल्या चित्रपट प्रवासाची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा यंदाच्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) विशेष सन्मान करण्यात येणार आहे. इफ्फीच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांचा हा गाैरव सोहळा पार पडणार असल्याचे दिल्लीतील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी यापूर्वी पाहुणे म्हणून इफ्फीमध्ये हजेरी लावली आहे. परंतु यावेळी त्यांची हजेरी ही ‘विशेष’ राहणार आहे. चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांमध्ये रजनीकांत यांचे नाव घेतले जाते.

वय वाढल्याचे शरीरयष्टीवरून दिसत असले तरी आजही त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज सुपरस्टार, मेगास्टार आहेत, परंतु यातही रजनीकांत यांनी आपला एक चाहता वर्ग टिकवून ठेवला आहे, या चित्रपट रसिकांच्या जोरावरच ते वय वाढले तरी अभिनय जिवंत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत, असे म्हणता येऊ शकते.

‘द ब्लू ट्रेल’ने शुभारंभ

ब्राझिलियन चित्रपट ‘द ब्लू ट्रेल’ ने या वर्षीच्या चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. एका ७५ वर्षीय महिलेने अमेझॉनच्या जंगलात स्वांतत्र्य आणि हक्कासाठी केलेला संघर्ष या चित्रपटातून दाखवला गेला आहे. या चित्रपटाने बर्लिन चित्रपट महोत्सवा ‘सिल्वर बेअर, ग्रॅंड ज्यूरी’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

योगदानाची दखल

चित्रपटसृष्टीत दिलेल्या त्यांच्या योगदानाचे भारत सरकारनेही दखल घेतली आहे. त्यांना २००० मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्म विभूषण म्हणून गौरविण्यात आले आहे. याशिवाय २०२१ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. याशिवाय इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना २०१९ मध्ये ‘सुवर्ण महोत्सवी आयकॉन पुरस्कार' देऊनही गौरविण्यात आले होते. याशिवाय त्यांनी विविध प्रतिष्ठित पुरस्कारही प्राप्त केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: विश्वविक्रम! अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा पार

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

SCROLL FOR NEXT