Rajesh Patnekar Dainik Gomantak
गोवा

राजेश पाटणेकरांच्या ‘मनपरिवर्तन’ मागचे नाट्य !

उमेदवारीवरुन राज्यभरात खल, डिचोलीतील निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग

दैनिक गोमन्तक

डिचोली : उमेदवारीवरून राज्यभरात खल सुरू असताना डिचोलीत मात्र, एक वेगळेच ‘नाटक’ रंगत होते. विद्यमान सभापती तथा भाजपचे आमदार राजेश पाटणेकर यांनी अचानक आपण यंदाची निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर करून टाकले. हा भाजपला एक वेगळा धक्का होता.

उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न भाजपश्रेष्ठींना सतावू लागला. माजी आमदार तथा मगोपचे उमेदवार नरेश सावळ यांनाही गळ घालण्यात आली.वास्तविक काही दिवसांपूर्वी सावळ ही भाजपच्या उमेदवारीच्या स्पर्धेत होते. जि. पं. निवडणुकीत तर त्यांनी भाजपला मदतही केली होती. पण ही भाजपची उमेदवारी पाटणेकरांना मिळणार हे निश्चित झाल्यामुळे आपली डाळ तिथे शिजणार नाही, हे सावळांना कळून आले व त्यांनी आपला मोर्चा पुन्हा मगोकडे वळविला. त्याप्रमाणे त्यांनी पक्षातर्फे कार्यही सुरु केले.

आता एवढे पुढे गेल्यावर परत भाजपचा (BJP) उमेदवार म्हणून ‘श्रीगणेशा’ कसा करायचा असे वाटल्यामुळे सावळांनी भाजपची उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्यानंतर भाजपश्रेष्ठींनी डिचोलीतून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणाऱ्या डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनाही गळास लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आपने पाठिंबा दिल्यामुळे त्यांनीही भाजपशी सोयरीक नाकारली. त्यामुळे भाजपला परत आपली गाडी पाटणेकरांकडेच वळवावी लागली. आणि पाटणेकरांनी हो ना करता करता, शेवटी होकार देऊन टाकला. हे म्हणजे ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ अशातला प्रकार वाटला. पाटणेकर हे तीन वेळा निवडून आले असले तरी त्यांना अजूनपर्यंत मंत्रिपद मिळालेले नाही. यावेळी त्यांना सभापतिपदावरच समाधान मानावे लागले.

यातून राजेश पाटणेकरांनी (Rajesh Patnekar) पक्षातील आपले आसन बळकट केल्याचे दिसते आहे. तरीही त्यांच्या पुढे डिचोलीत अनेक आव्हाने वाढून ठेवली आहेत. मगोपच्या नरेश सावळ, अपक्ष डॉ. चंद्रकात शेट्ये, कॉंग्रेसचे मेघश्याम राऊत बरोबरच शिल्पा नाईक व त्यांचे कार्यकर्ते यांच्याशी पाटणेकरांना सामना करावा लागणार आहे. पाटणेकर हे मतदारांशी चांगला संपर्क ठेवून असलेले नेते म्हणून ओळखले जातात. डिचोलीत पाटणेकरांना भाजपचे ‘हुकमी नाणे’ म्हटले जाते. ते या निवडणुकीत पुन्हा चालते, का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

निवडणूक न लढवण्याचे ‘नाट्य’ !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पाटणेकरांना पुढच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले आहे. अर्थात हे आश्वासन जर- तर वर अवलंबून आहे. त्याकरिता भाजपचे सरकार यायला हवे व पाटणेकर डिचोलीतून निवडून यायला हवेत. भाजपातला एक गट माजी जि. पं. सदस्य शिल्पा नाईक यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांचा पाटणेकरांच्या उमेदवारीला विरोध होता. पक्षातील या ‘तू तू मैं मैं ला ’ कंटाळून पाटणेकरांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असावा, असे सांगितले जाते. पण हे एक राजकीय ‘नाट्य’ च म्हणावे लागेल. हा खुंटा हलवून घट्ट करण्याचा प्रकार वाटतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT