Rajan Korgaonkar Dainik Gomantak
गोवा

Rajan Korgaonkar : मोपा’वर स्थानिकांना 60 टक्के आरक्षण द्या!

टॅक्सी काउंटरवर पेडणे तालुक्यासाठी 60 टक्के आरक्षण असावे अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem : मोपा विमानतळावर पेडणेकरांना येलो-ब्लॅक टॅक्सी स्टॅंड 100 टक्के मिळणारच. या व्यतिरिक्त विमानतळावर पाहिजेत तितके टॅक्सी स्टॅंड सुरू करा, त्याला आमची हरकत नाही. पण प्रत्येक टॅक्सी काउंटरवर पेडणेकरांना 60 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मिशन फॉर लोकलचे निमंत्रक राजन कोरगावकर यांनी केली.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की सध्या ‘मोपा’वर टॅक्सी स्टॅंड मिळावा म्हणून तीन संघटना स्थापन झालेल्या आहेत. या तिन्ही संघटना एकत्रित येवून संघटीत झाल्या तर एक मोठी शक्ती उभी राहू शकते. कसलेही नियोजन अथवा बंधन नसल्याने मोपा विमानतळ प्रकल्पाद्वारे आता पर्यंत पेडणेकरांना रोजगारीच्या दृष्टीने कसलाही लाभ झाला नाही.

टॅक्सी व्यवसाय रोजगारीच्या दृष्टीने ही शेवटची आशा आहे. सुरु करण्यात येणाऱ्या टॅक्सी काउंटरवर पेडणे तालुक्यासाठी 60 टक्के आरक्षण असावे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत. आमची ही न्याय्य मागणी मान्य केल्यास सध्या उद्भवलेला विषयच संपुष्टात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT