Raincoat 
गोवा

Monsoon 2023 : रेनकोट, छत्र्यांनी शहरातील दुकाने सजली; मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल

अडगळीत पडलेल्या छत्र्यांची दुरुस्ती; मागणी वाढली

दैनिक गोमन्तक डिजिटल

पाऊसधारा सुरू होणार म्हटल्यावर छत्र्या बाहेर पडणारच. काही दिवसांपूर्वी उन्हाचा चटका सहन होत नव्हता म्हणून खासकरून महिला वर्ग हातात छत्र्या घेऊन फिरताना दिसत होता. परंतु आता मॉन्सून काही तासांत राज्यात सक्रिय होईल, या शक्यतेने छत्री किंवा रेनकोट तरी खरेदी करणे गरजेचेच असते. सध्या बाजारात दोन्ही वस्तूंची रेलचेल असल्याचे दिसून येत आहे.

पारा चढल्याने उकाडा अधिक तीव्रपणे जाणवू लागला होता. त्यामुळे शिक्षण खात्याने शनिवारी मुलांना शाळेला सुट्टी जाहीर केली होती. सलग दोन दिवस मुलांना सुट्टी मिळेल आणि तोपर्यंत वातावरणात बदल घडेल अशी शक्यता वाटत होती, ती वास्तवात आली.

शुक्रवारी सायंकाळी आणि शनिवारी सकाळी व सायंकाळी पणजी शहर परिसरात पावसाचा शिडकावा झाला. मॉन्सून सक्रिय होईल, त्यामुळे आताच पावसापासून संरक्षणासाठी लागणाऱ्या छत्र्या किंवा रेनकोटची खरेदी करताना लोक दिसू लागले होते.

रंगीबेरंगी छत्र्या

अनेक रंगीबेरंगी छत्र्या बाजारात आल्या तरी वेगवेगळा लूक असणाऱ्या छत्र्यांची क्रेझ सध्या आहे. लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्यासाठी एक दांडी मध्यम आकाराच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. अगदी 100 रुपयांपासून ते पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत छत्र्या उपलब्ध असल्याचे येथील विक्रेत्याने सांगितले.

‘ऑनलाईन’ रेनकोट स्वस्त

बाजारात 99 रुपयांना कोणतीही वस्तू विक्री करणाऱ्या दुकानात छत्र्या उपलब्ध आहेत. या छत्र्या खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल असल्याचे दिसत होते. याशिवाय सहाशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत नामांकित कंपन्यांचे रेनकोट बाजारात उपलब्ध आहेत. असे असले तरी सध्या ऑनलाईन बाजारात रेनकोट निम्म्या किमतीत मिळत असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT