Rain Updates: Yellow alert issued in Goa for 4 days Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Updates: राज्यात पुन्हा पावसाचा इशारा

काही दिवसांत गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : तामिळनाडू किनाऱ्याजवळील कालचे मंदीचे क्षेत्र कमी-दाबाच्या क्षेत्रात कमकुवत झाले आणि उत्तरेकडील तामिळनाडू आणि शेजारच्या भागात पसरले. येत्या काही दिवसांत गोव्यातील (Goa Rain Updates) दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मागील अंदाजानुसार, 12 नोव्हेंबरपासून उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याच्या वेधशाळेने दिला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी काही काळ वातावरण ढगाळ होते. नंतर मात्र उन्हाचा पारा वाढू लागला. 13 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबर रोजी ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची आणि पूर्व-मध्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर ते केंद्रित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पडू शकतो.

राज्यात हवामान खात्याने कालपासून चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात काही ठिकाणी मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. गुरूवारी हा यलो अलर्ट मागे घेण्यात आला होता. मात्र आजपासून पुन्हा हवामान वेधशाळेने पावसाचा इशारा दिला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यात पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT