Goa Rain Updates | Goa Weather News Dainik Gomantak
गोवा

मॉन्सून येत्या गुरुवारपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

गेल्या 4 वर्षात जून आणि जुलैमध्ये पडणाऱ्या पावसाने सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावली आहे.

आदित्य जोशी

पणजी : गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून राज्यात जून आणि जुलैमध्ये पडणारा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडला आहे अशी माहिती हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिली.

वैज्ञानिक एम.राहुल यांनी सांगितले, 4 ऑगस्टनंतर पश्‍चिम बंगालमध्ये परत पुन्हा कमी दाबाचे पट्टे तयार होऊन मॉन्सूनपूरक स्थिती निर्माण होईल. त्यामुळे सध्यातरी आहे तसेच हवामान कोरडे राहील व पावसाची शक्यता कमी असेल.

असे असले तरी गेल्या 4 वर्षात जून आणि जुलैमध्ये पडणाऱ्या पावसाने सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावली आहे. राज्यात जून महिन्यात 914 मिलिमीटर तर जुलै महिन्यात 1047 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद होते. पण गेल्या चार वर्षांत तो सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. 2019 च्या जुलै महिन्यात 1312, 2020 मध्ये 1253, 2021 मध्ये 1281 तर 2022 मध्ये 1187 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने मॉन्सून पावसाचे मानले जातात. त्यात जुन, जुलैत सर्वाधिक दोन तृतीयांश पाऊस पडतो. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरला एक तृतीयांश पाऊस पडतो असा अनुमान आहे.

8 जुलैला अतिवृष्टी

यंदाच्या मॉन्सून हंगामात सर्वाधिक पाऊस 8 जुलै रोजी 161.8 मीटर झाला असून 5 जुलैला 156.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात मोठे पाऊस होते. राज्यात आतापर्यंत 2016.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 1961 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. त्यामुळे पावसाने ओढ दिली असली तरीही जुलै महिन्यापर्यंतचा पाऊस 2.8 टक्के जास्त आहे. जुलै महिन्यात 1047 मिमी पाऊस अपेक्षित होता. तो 1171 मिलिमीटर झाला आहे. नियमित सरासरीपेक्षा तो 9 टक्के जास्त आहे.

केपे तालुक्यात सर्वाधिक पाऊस

आतापर्यंत सर्वाधिक पाऊस केपे येथे 2422.8 मिलिमीटर झाला आहे. त्या खालोखाल पेडणे येथे 2315.6 मिलिमीटर, सांगे येथे 2227.7 मिलिमीटर व वाळपई येथे 2181.4 मिलिमीटर तर सर्वात कमी पाऊस दाबोळी येथे 1696.7 मिलिमीटर झाला आहे.

गेल्या 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून पुढील दोन-तीन दिवसही पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, 4 ऑगस्टच्या दरम्यान बंगालचा उपसागर आणि देशाच्या मध्य भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता असून यामुळे पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होईल. यामुळे 4 ऑगस्टनंतर मॉन्सून पुन्हा बरसू लागेल, असंही एम. राहुल यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

SCROLL FOR NEXT