Taleigao Road Collapse Dainik Gomantak
गोवा

Watch Video: ताळगावमध्ये पावसाचं थैमान! स्कोडा शोरूमजवळ फूटपाथ कोसळला; रस्ता तात्काळ 'बंद'

Taleigao Rain Video: गोव्यात सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ताळगाव परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे

Akshata Chhatre

taleigao road closed: गोव्यात सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ताळगाव परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील स्कोडा शोरूमजवळ असलेला रस्त्याच्या कडेचा फूटपाथ (पादचारी मार्ग) आणि त्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. भूस्खलन झाल्यामुळे कोसळलेला ढिगारा थेट खालील शेतामध्ये पडला.

ताळगावमध्ये फूटपाथ आणि संरक्षक भिंत कोसळली

या दुर्घटनेमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी, कोसळलेल्या भागाचा वापर पादचाऱ्यांनी करू नये म्हणून हा रस्ता तात्काळ बॅरिकेड्स लावून सील करण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे झालेल्या या नुकसानीने ताळगाव परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर पकडलाय. भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत 'यलो अलर्ट' जारी केला असतानाच ताळगावमध्ये फूटपाथ कोसळण्याची घटना अशा वेळी घडली आहे, गोव्यात सध्या पावसाची तीव्रता वाढली असून हवामानातील या बदलाला दोन वेगवेगळ्या हवामान प्रणालींचा संयुक्त प्रभाव कारणीभूत आहेत.

गोव्यात 'यलो अलर्ट' आणि चक्री वादळाचा धोका

अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर: गोव्यापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला दुसरा कमी दाबाचा पट्टा चक्रीय वाऱ्यात रूपांतरित होऊन पश्चिमेकडे सरकत आहे.

गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी दैनिक गोमंतकला दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीय वाऱ्यांमुळे गोव्यासह कोकणपट्ट्यात पावसाची तीव्रता वाढली आहे आणि पुढील आठवडाभर राज्यात मध्यम ते अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता कायम राहील.

नागरिकांना धोक्याचा इशारा

सध्याच्या हवामान स्थितीनुसार, उत्तर आणि दक्षिण गोव्यात ३०-४० किमी/ताशी वेगाने विजांचा कडकडाट आणि ५० किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जनतेला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

नागरिकांनी विजांच्या कडकडाटादरम्यान मोकळ्या जागेत जाणे टाळावे आणि समुद्रातील परिस्थिती कठीण असल्याने समुद्रात जाण्यापासून दूर राहावे. ताळगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: ओंकार हत्तीची दोडामार्गात पुन्हा एन्ट्री; बागायतींचे मोठ्या प्रमाणात केलं नुकसान, कळपात परतण्याची शक्यता

ZP Election: डिचोलीत उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्‍ये! चारही मतदारसंघात 31 हजार 723 मतदार

Smriti Mandhana: 'जास्त प्रेम करणारे...', स्मृती मंधाना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली Watch Video

Konkan Railway: कोकण रेल्वेचा फुकट्यांना दणका; विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 17.83 कोटी दंड वसूल

Canacona: विद्यार्थिप्रिय शिक्षिकेची बदली रद्द, मुलांचा हट्ट पूर्ण; पालकांच्‍या आंदोलनाला यश

SCROLL FOR NEXT