Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: कुठे झाड कोसळले तर कुठे घराची पडझड; दक्षिण गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान

जूनच्या पहिल्याच दिवशी दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

Pramod Yadav

Goa Rain Update: जूनच्या पहिल्याच दिवशी दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मडगावमध्ये सकाळी सोसाट्याचा वारा त्यासह पावसाच्या सरी बरसल्या, अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली.

पाऊस आणि वाऱ्यामुळे काही ठिकाणी घर आणि झाडांची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. तर, माहामार्गावर देखील झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली.

मडगावमध्ये वाऱ्यामुळे एसजीपीडीए मैदानावरील फेस्ताच्या फेरीतील दुकानांचे नुकसान झाले आहे. फेरीतील दुकानांचे छप्पर कोसळून नुकसान झाले. मडगाव पालिकेच्या प्रवेशद्वारावर पहिल्या पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले.

धर्मापूर पंचायत परिसरात जाकनीबांध येथे झाड कोसळल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वास्कोत घरावर माडाचे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. अग्रिशमन दलाच्या जवानांनी घरावर पडलेले झाड हटवले आहे.

Goa Rain Update

दवर्ली परिसरात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला मात्र, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसानाची नोंद झाली आहे.

धारबांदोडा येथे वादळी वाऱ्याने रस्त्याच्या बाजुला असलेली गुलमोहरची झाडे मोडून विद्युत वाहिन्यावर पडले. यामुळे कालपासून अनेकांच्या घराचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

सासष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच, ताळावली, नावेली येथे घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे विविध ठिकाणी विद्युत पोल उन्मळून पडले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Goa Live News: अमित पाटकर यांनी केजरीवालांवर निशाणा साधला!

Ronaldo Goa Visit: 'रोनाल्डो' गोवा दौऱ्यावर येणार का? माहिती अजूनही गुप्त; आगमनाबाबत साशंकता

Goa Politics: ‘आरजी’सोबत युतीचा निर्णय चर्चेनंतर', माणिकराव ठाकरेंची स्पष्टोक्ती; राज्‍यभरात काम सुरू केल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT