Goa Farming Dainik Gomantak
गोवा

Goa Farming: शेतीसाठी पोषक ठरतोय पाऊस

Goa Farming: बळीराजा सुखावला : भातपिकासह भाजीपाल्यासाठीही ठरणार वरदान

दैनिक गोमन्तक

Goa Farming: राज्यात ऐन चतुर्थी उत्सवादरम्यान पाऊस पडत असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडले असले तरीदेखील हा पाऊस शेतीसाठी खूपच पोषक आहे. त्यामुळे ठरावीक अंतराने पडत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

मागील महिन्याभरापासून राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नव्हता. जमिनीत ओलावा कमी होता. जर आणखी काही दिवस पावसाविना गेले असते तर राज्यातील पिकांवर संकट ओढविण्याची शक्यता कृषी तज्नी वर्तविली होती.

काही दिवसांपूर्वी तर पावसाने ओढ दिल्याने वरुण राजाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. पण आता पाऊस शेतीसाठी खासकरून भातशेती पोषण घेण्याच्या काळात पडत असल्याने शेतकऱ्यांसाठी चतुर्थी सण सुखवार्ता देणारा ठरत आहे.

यंदाचा ऑगस्ट हा सर्वात उष्ण ऑगस्ट महिना ठरला. हा महिन्यातील पंधरावडा देखील उष्ण आणि पाऊस विरहित गेला. यंदा राज्यात जूनच्या मध्यात मॉन्सूनचे आगमन झाले. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला; परंतु ऑगस्ट महिन्यात केवळ १२ इंच पाऊस पडला.

या महिन्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत असून आतापर्यंत राज्यात एकूण ११९. ९२ इंच पाऊस पडला आहे. पावसाने सरासरी पार केल्याने पुढील काळात जर पाऊस पडला नाही तर भविष्यात पिकांवर संकट येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

अन्य पिकांसाठीही लाभदायक

हा पाऊस भात पिकांसोबतच काकडी, दोडका, भाजीपाला, अळूमाडी, चिबूड, कणगी तसेच इतर पिकांसाठीही पाऊस पोषक ठरत आहेत. मागील महिन्याभरापासून विविध भाजीपाल्याचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने ओढ दिल्यामुळे काकडी, तसेच इतर भाजी पिकांवर संकट आले होते. मात्र, आता पुढील काही दिवस जमिनीतील ओलावा कायम राहणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT