Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मान्सूनची वाटचाल वेळेआधीच; येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्यता

Goa Rain Update : वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून 5 जूनपर्यंत सक्रिय होतो, मात्र तो वेळेअगोदरच दाखल होईल.

दैनिक गोमन्तक

Goa Rain Update : बंगालच्या उपसागर आणि अंदमान-निकोबार बेट समूहावर वेळेअगोदरच दाखल झालेला मान्सून राज्यात वेळेपूर्वीच दाखल होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मान्सूनने राज्याशेजारी कारवारपर्यंत आगेकूच केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचे मान्सूनच्या पावसात रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही, अशी माहिती हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिली आहे.

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सून 5 जूनपर्यंत सक्रिय होतो, मात्र तो वेळेअगोदरच दाखल होईल. बंगालच्या उपसागर आणि अंदमान निकोबारमध्ये यंदा सर्वात अगोदर म्हणजे 20 मेला दाखल झाला होता.

मात्र, मान्सूनचा दक्षिण अरबी समुद्रात प्रवास काहीसा रेंगाळला होता. आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांना मिळालेली गती, समुद्रावरून वाहणारी आद्रता आणि कमी उंचीवर निर्माण होणारे ढग व आरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा या सर्व पोषक स्थितीमुळे मान्सूनची वाटचाल वेळेआधीच होत आहे. मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात दाखल होणार आहे.

आज मान्सूनने मध्य अरबी समुद्र, केरळचा संपूर्ण भूभाग, कर्नाटक आणि तमिळनाडूतील काही भाग तसेच बंगालच्या उपसागराचा मध्य भाग व्यापला आहे, ही स्थिती उद्यापर्यंत बदलून मान्सूनची आगेकूच चालूच राहील.

लवकर मान्सूनची शक्यता!

अलिकडच्या काळात यापूर्वी सर्वात लवकर 2011 साली मान्सून 3 जूनला राज्यात दाखल झाला होता. तर 2013 मध्ये तो 4 जूनला दाखल झाला होता. यंदाची मान्सूनची वाटचाल आणि पोषक स्थिती लक्षात घेतल्यास मान्सून 2 किंवा 3 जूनला राज्यात दाखल होऊ शकतो. कदाचित गेल्या दहा वर्षांतील ही पहिलीच वेळ असूही शकेल. गेल्या दहा वर्षात 2019 मध्ये 20 जूनला म्हणजे सर्वात उशिरा पाऊस आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT