Goa Railway Project Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Railway Project Updates: रेल्‍वे दुपदरीकरणामुळे एकाही घराचे नुकसान नाही; अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आश्वासन

Velasao Railway Expansion Update: रेल्‍वे दुपदरीकरणामुळे वेळसाव येथील एकाही घराला धोका पोचणार नाही, असे आश्‍‍वासन रेल निगमतर्फे स्‍थानिकांना बैठकीत देण्‍यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: रेल्‍वे दुपदरीकरणामुळे वेळसाव येथील एकाही घराला धोका पोचणार नाही, असे आश्‍‍वासन रेल निगमतर्फे स्‍थानिकांना बैठकीत देण्‍यात आले. हे रुंदीकरण नेमके कशा प्रकारचे असेल, याची शहानिशा करण्‍यासाठी आता १२ नोव्‍हेंबर रोजी स्‍थानिक आणि रेल्‍वे अधिकारी यांच्‍या उपस्‍थितीत एक संयुक्‍त सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी दिली.

रेल्‍वे रुंदीकरणाच्‍या कामासाठी बुधवारी आलेल्‍या रेल विकास निगमच्‍या अधिकाऱ्यांना स्‍थानिकांनी अडविले होते. या रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणात आमची घरे पाडली जातील, अशी भीती स्‍थानिकांनी व्‍यक्‍त केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार फर्नांडिस यांच्‍या मागणीवरून दक्षिण गोवा जिल्‍हाधिऱ्यांनी आज रेल अधिकारी आणि स्‍थानिक प्रतिनिधी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीनेत कोठावळे उपस्‍थित होते.

कॅ. विरियातो फर्नांडिस, दक्षिण गोवा खासदार

बैठकीत स्‍थानिकांनी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे आपल्‍या तक्रारी मांडल्‍या. यावर रेल निगमच्‍या अधिकाऱ्यांनी खुलासेही केले. या रुंदीकरणासाठी रेल्‍वेने नेमकी कुठली जागा संपादित केली आहे हे पाहण्‍यासाठी आता संयुक्‍त सर्वेक्षण केले जाणार आहे. या मार्गामुळे लोकांच्‍या येण्‍या-जाण्‍यावर परिणाम होऊ नये यासाठीही उपाययोजना करावी अशी विनंती रेल निगमला करण्‍यात आली असून, ती मान्‍य करण्‍यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anganwadi Goa News: तान्हुल्याच्या संगोपणाची चिंता मिटली! केंद्रीय योजनेतून 9 तालुक्यांमध्ये अंगणवाडीत पाळणा घरांची व्यवस्था

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्याची व्यापती वाढली; दीपश्रीचा आणखी एक कारनामा समोर

Yuri Alemao: तरुणांना प्रोत्साहन देण्यात कला, संस्कृती खातं अपयशी; युरी आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT