Konkan Railway
Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

वेळसाव येथे रेल्वेचे बॅरीकेटींग काम रोखले

दैनिक गोमन्तक

वास्को : ‘गोंयचो एकवोट’ने आरवीएनएल (रेल्वे) वेलसाव मध्ये रेल्वे ट्रॅक लगतचे बॅरिकेटींग बसवण्याचे काम रोखले. हैदराबादस्थित एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्याच्या कामगारांसह वेळसांव केव्हल क्रॉसिंगजवळ सध्याच्या सिंगल रेल्वे ट्रॅकला समांतर बॅरिकेट्स बसवत होते. त्यांचा हा प्रयत्न ‘गोंयचो एकवोट’ने हाणून पाडला.

रेल्वे दुपदरीकरणासाठी रेल्वे प्राधिकरणाने कंबर कसली असून कोळसा वाहतुकीसाठी हा खटाटोप चालवला आहे. मात्र मुरगाव तालुक्यात वेळसाव, कासावली व इतर भागातील गावकऱ्यांनी मात्र या कामाला जोरदार विरोध दर्शविला आहे.

मात्र रेल्वे प्राधिकरण कधी मध्यरात्री, तर कधी दिवसा छुप्या मार्गाने सदर रेल्वेचे दुपदरीकरण मार्ग करण्याचे काम गावकऱ्यांना विश्वासात न घेता करण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

ज्या ज्या वेळी रेल्वे अधिकारी या गावात काम करायला येतात, त्या त्या वेळी येथील जागृत नागरिकांनी त्यांना हाकलून लावले आहे. काहीवेळा येथे रेल्वेने रेल्वे पोलिसांचा धाक दाखवून सदर दुपदरीकरणाचे काम चालू ठेवण्याचा प्रयत्न केला.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या पूर्वजांनी गावातील समाजासाठी हा पारंपारिक हक्काचा मार्ग करून ठेवला आहे. 1890 च्या दशकात ही जमीन तत्कालीन ब्रिटिश कंपनीला कधीही विकली किंवा भेट म्हणून दिली नाही.

उलट मुरगाव बंदरावर आधारित तत्कालीन रेल्वे प्राधिकरणाने बंदरातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि नंतर प्रवाशी वाहतुकीसाठी एकच रेल्वे ट्रॅकची परवानगी दिली, मात्र आज स्थिती वेगळीच आहे. आज आपण पाहतो तो कोळसा वाहतूक या मार्गावरून 10-12 कोळसा वाहतूक करणारे रेलडबे बहुतेक रात्रीच्या वेळी जेव्हा गावकरी झोपलेले असतात त्या वेळी जातात.

कंत्राटदाराने घेतला काढता पाय

आज रेल्वेने वेळसांवमध्ये राईट ऑफ वे चे बॅरिकेटिंग घालण्याचा प्रयत्न केला असता गोंयचो एकवोट पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून कंत्राटदाराला कळवले, की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या भागात कोणतीही कामे सुरू होऊ शकत नाहीत.

त्यामुळे तुम्ही येथून काढता पाय घेणे बरे, असे त्या कंत्राटदाराला सांगितले. मग कंत्राटदाराने त्यांच्या वरिष्ठांशी आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बोलल्यानंतर बॅरिकेट्स चे खांब स्वतःच ट्रकमध्ये भरले व तेथून काढता पाय घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

SCROLL FOR NEXT