Gambling  Dainik Gomantak
गोवा

Online Gambling In Goa: ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा; सातजणांना अटक

Online Gambling In Goa: म्हापशात कारवाई: 4.35 लाखांचे साहित्य जप्त

दैनिक गोमन्तक

Online Gambling In Goa: म्हापसा पालिकेच्या गार्डनजवळ असलेल्या एका ऑनलाइन जुगार अड्ड्यावर गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने काल संध्याकाळी छापा टाकून 7 जणांना अटक केली व त्यांच्याकडून 3.96 लाखांची रोकड मिळून 4.35 लाख रुपये किमतीचे जुगार साहित्य जप्त केले. ही कारवाई खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली.

संशयितांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. म्हापसा नगरपालिकेच्या गार्डनजवळ असलेल्या एका दुकानात जुगार सुरू असल्याची माहिती गुप्तहेरांनी गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना दिली होती.

त्यामुळे रात्रीच्यावेळी तेथे छापा टाकण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. त्यासाठी पोलिस पथक तयार करण्यात आले. अधीक्षक निधीन वाल्सन आणि उपअधीक्षक सुरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली

साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय अवखाले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सायंकाळी 6.20 ते 7.10 दरम्यान छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी ‘खेलो जीतो’ या नावाने ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने खेळणाऱ्या सातजणांना ताब्यात घेतले. या जुगार खेळणाऱ्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून पथकाने 3.93 लाखांच्या रोकडसह दोन लॅपटॉप मिळून 4.35 लाख रुपये किमतीचे जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी साहाय्यक उपनिरीक्षक विजय अवखाले पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT