Ro-Ro Ferry In Goa Dainik Gomantak
गोवा

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ ढकलला पुढे! काँक्रिटीकरणामुळे विलंब; 14 जुलै रोजी होणार उद्धाटन

Ro Ro Ferryboat Chorao Raibandar: खात्याने येत्या १४ रोजी रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ करण्याचे निश्चित केल्याची माहिती खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: राज्याच्या अंतर्गत जलमार्ग खात्याच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ तीन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. ११ रोजी हा कार्यक्रम होणार होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम तीन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

खात्याने येत्या १४ रोजी रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ करण्याचे निश्चित केल्याची माहिती खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी दिली. दरम्यान, यास खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही दुजोरा दिला आहे. मांडवी नदीत रायबंदर ते चोडण या जलमार्गावर सर्वाधिक वाहनांची ये-जा असते.

त्याशिवाय या मार्गावर सहा फेरीबोटींना तैनात करावे लागते. त्यामुळे या मार्गावर रो-रो फेरीबोट सेवा सुरू केल्यास त्यातून चारचाकी वाहनांना, पायलट दुचाकींना तसेच पर्यटकांना भाड्याने दिल्या जाणाऱ्या दुचाकींना आकारण्यात येणाऱ्या तिकीट आकारणीतून महसूल प्राप्ती होणार आहे.

राज्य सरकारने यासाठी खास इतर राज्यांत चालणाऱ्या बोटींप्रमाणे स्थानिक विजय मरीन या कंपनीकडून बोटींची बांधणी करून घेतली आहे. रो-रो फेरीबोट सेवा सुरू झाल्यानंतर यापूर्वी फेरीबोटीला लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळ लागणार आहे.

‘वाहनांचे शुल्क कमी करावे’

तिसवाडी (प्रतिनिधी): रो-रो फेरीबोटीत वाहनांचे शुल्क कमी करून लोकांना दिलासा द्यावा, अशी लेखी मागणी चोडण-माडेल पंचायतीने सरकारकडे केली आहे. या मार्गावरील वाहनांच्या वाढीमुळे चोडण बेटावरील लोकांत असंतोष वाढला असून या रो-रो फेरीबोटीचे शुल्क पूर्वीप्रमाणेच रु. १०/- ठेवण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India New Coach: गोव्याचा सुपुत्र आता टीम इंडियाचा 'बॉस'! महेश गवळी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

महासत्ता अमेरिकेवर 39 ट्रिलियन डॉलरचे कर्ज; करकपात, युद्धांवरील खर्चामुळे बोजा वाढला

IFL 2026: धेंपो क्लबला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, तीन लढतीतून दोन गुण; गोकुळम केरळाविरुद्ध आज सामना

Dhurandhar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'हमजा अली'चा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी तोडला मोठा विक्रम; कलेक्शन 100 कोटी पार

Ahmed Shahzad slams PSL: "IPL च सरस!" 'पीएसएल'वर भडकला पाकिस्तानी स्टार खेळाडू; सांगितल्या 'या' 3 मोठ्या चुका

SCROLL FOR NEXT