Goa Gangrape Case: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत Dainik Gomantak
गोवा

Goa Gangrape Case: मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शरमेने मान खाली गेली

आमच्या गोव्यातील मुख्यमंत्र्यांनी आरोपींना दोषी ठरवण्याऐवजी पिडीतांनाच दोषी ठरवले आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) कालपासून पावसाळी अधिवेशन (Goa Assembly Session) सुरू झाले आहे. यात सरकारला (Government) विरोधी पक्षनेत्यांनी अनेक प्रश्न विचारून निरूत्तर केले. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराची (Gangrape Case) अनेक प्रकरणे उघडीस येत आहेत. याच मुद्यावरून काल विधानसभा गाजली. सध्या मुख्यमंत्र्यांच्या 'मुली रात्रभर बीचवर कशासाठी?'या वक्तव्यावरून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. (Rahul Mhambre said Pramod Sawant statement made me go down in shame)

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी बलात्काराच्या मुद्यावरून विचित्र विधान सभागृहात केले. "किशोरवयीन मुलांच्या पालकांनी त्यांचे मुलं गोवा बीच वर अंधाऱ्या रात्री काय करतात याचे परिक्षण केले पाहिजे, मुली रात्री समुद्रकिनाऱ्यावर काय करतात हे बघितले पाहिजे" असे भंपक विधान गोव्यासारख्या आधूनिक आणि सुशिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केले.

"आमच्या गोव्यातील मुख्यमंत्र्यांनी आरोपींना दोषी ठरवण्याऐवजी पिडीतांनाच दोषी ठरवले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे शरमेने मान खाली गेली. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा मी तीव्र निषेध करतो," असे ट्विट आम आदमी पक्षाचे राहूल म्हांबरे यांनी केली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "त्या चार आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक सरकारी नोकर होता, ज्याला निलंबित करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींना बाहेर पाठवताना पालकांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे."

गोवा विचाराने, आधुनिकतेने पुढारलेले राज्य आहे. त्या राज्यातील तरूण रात्री बीचवर काय करतात? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणे शोभत नाही. मुळात सावंत सरकारने या बीचवरच्या सुरक्षिततेसाठी काय प्रयत्न केले किंवा काय करायला पहिजे यावर भाष्य करणे अपेक्षित होते. बलात्कार का वाढतायेत समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचे काय या विषयी बोलायचे सोडून त्यांनी गोव्यातील पालकांनाच विचित्र सल्ला दिल्याने कालची विधानसभा जोरदार गाजली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

SCROLL FOR NEXT