पणजी: पणजी लगतच्या मेरशी भागात जाणार्या रस्त्यावर साचणारे पाणी आणि तो रस्ता पाण्याखाली जाण्याचे प्रकार बंद करण्यात येतील असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर (Public Works Minister Deepak Pauskar) यांनी आज विधानसभेत दिले.
सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस (MLA Antonio Fernandes) यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर देताना दीपक पाऊसकर यांनी सांगितले की पुराखालील रस्ता बाहेर काढण्यासाठी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था आजच्या आज करण्यात येईल.
सांग्यातील पुनर्वसन प्रश्न लोंबकळलेलाच
पणजी: सांगे येथे साळावली धरण झाले. त्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चाळीस वर्षे प्रलंबित असल्याकडे सांग्याचे आमदार प्रसाद गावकर (MLA Prasad Gavkar) यांनी आज विधानसभेत शून्य तासाला सरकारचे लक्ष वेधले.
ते म्हणाले पुनर्वसन केलेल्या कुटुंबांना भूखंड देण्यात आले, मात्र त्या भूखंडाची मालकी त्यांच्याकडे देण्यात आलेली नाही. महसूल मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही हा प्रश्न आता सुटलेला नाही. त्यांना दुसऱ्या दर्जाची मालकी सरकारने दिलेली आहे ती पहिल्या दर्जाची मालकी देणे आवश्यक आहे. चाळीस वर्षानंतर तरी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल की नाही असे मला सरकारला विचारायचे आहे.
महसुलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी लवकरात लवकर लवकर सोडवू असे यावर आश्वासन दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.