Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

मनमोकळेपणा भावला; राहुल गांधींना चक्क महिलेने मारली मिठी

'तू इंदिरा गांधींचा नातू शोभतोस'

Shubham Tate

पणजी : गोवा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आज शुक्रवारी एक वेगळे रुप दिसून आले. प्रचार करत असताना एका महिलेने राहुल यांना मिठी मारली. शिवाय त्यांनी सड्यातील एका घरामध्ये जाऊन देव्हाऱ्यातील देवाला फुले वाहिली, तेव्हा मात्र त्यांच्यावरील प्रेमामुळे लोकांचा ऊर भरून आला. जवळ असणाऱ्या एक ज्येष्ठ आजीबाई कौतुकाने म्हणाल्या, तू इंदिरा गांधींचा नातू शोभतोस!

मोठेपणाचा कसलाच आव नाही किंवा पुढे-मागे सुरक्षा रक्षकांचा तगादा नाही. साधा, कॉटनचा कुर्ता घालून राहुल गांधी वास्कोमधील सडा येथे आले. कोणी त्यांना मिठी मारली तर कोणी प्रेमाने गालावरून हात फिरवला. सडा येथे देवघरात शिरताच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाळी कुंकुमार्जन करण्यात आलं आणि हे अवघ कुटुंब गांधींच्या या साधेपणामुळे भारावून गेले. केवळ सडा येथेच नाही तर गांधींनी जेथे जाईल तेथे लोकांची मने जिंकली.

गांधींची एक झलक दिसावी म्हणून उन्हात थांबलेल्या साध्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेऊन, काँग्रेसचा झेंडा बुलंद ठेवायला तुमची साथ हवी, असे राहुल यांनी सांगितले. दाबोळी येथील लोकांच्या समस्या त्यांनी काळजीपूर्वक ऐकून घेतल्या. यातीलच एक महिला पुढे येत म्हणाली, मला तुमचा चेहरा पाहायचा आहे. गांधींनी चेहऱ्यावरील मास्क काढत तिला एक गोड स्माईल दिली. तितक्यात आणखी एक महिला पुढे येत आपुलकीने त्यांचा हात ओढत म्हणाली, मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. ती राहुल यांच्या जवळ आली आणि दोघांनी मिळून फोटोला पोझ दिली. हे दृश्य पाहिले की त्यातील प्रेमळ निरागसपणा आपल्या लक्षात येतोच येतो. राहुल गांधींची ही भेट केवळ काँग्रेसलाच (Congress) नाही तर काँग्रेसप्रेमी जनतेमध्येसुद्धा उभारी आणणारी ठरली.

रातकली एक ख्वाबमे आयी

घरोघरी जाऊन प्रचार करत असताना वास्कोतील (Vasco) डूलबा वळवईकर यांच्या घरात ते गेले. येथं एका ज्येष्ठ आजोबांना गांधी यांच्यासमोर गाणे गाण्याचा मोह आवरला नाही. संगीताच्या तालावर आजोबा गाणे म्हणू लागले. 'रातकली एक ख्वाबमे आयी' या गीतावर मान हलवीत गाण्यासोबत ठेका धरत राहुल यांनी दाद दिली. त्यांचा हा दिलदारपणा लोकांना खूप भावला.

चिमुकली आणि गांधी

गांधी यांच्याजवळ बसलेल्या चिमुकलीला हे गृहस्थ नेमके कोण आहेत, याची कदाचित माहिती नसावी. पण राहुल यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले, तिच्या शिक्षणाची चौकशी केली. बच्चे पार्टीने राहुल गांधी यांच्यासोबत 'चल बेटा सेल्फी ले ले रे' म्हणत सेल्फी काढले आणि राहुल यांनीसुद्धा लहान मुलांप्रमाणेच या गोष्टींचा निखळ आनंद लुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT